Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या त्याच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणदीपनं केवळ अभिनय केला नाहीये, तर त्यानं  या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमधील रणदीपच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या  चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, या चित्रपटात वीर सावरकरांसारखे दिसण्यासाठी रणदीप  हुड्डाने 26 किलो वजन कसे कमी केले.


रणदीप हुड्डा यानं 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी 18 किलो वजन कमी केलं, असं म्हटलं जात होतं. पण याबाबत आता आनंद पंडित यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, "18 नाही त्याने या भूमिकेसाठी 26 किलो वजन कमी केले आहे. जेव्हा तो माझ्या ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याचे वजन 86 किलो होते. त्या दिवसापासून तो चित्रपटातील या व्यक्तिरेखेचा अभ्यास करु लागला. त्यानं एक खजूर आणि एक ग्लास दूध असा डाएट फॉलो केला. रणदीपनं  4 महिने हा डाएट फॉलो केला"


पुढे आनंद पंडित यांनी सांगितलं, "रणदीप हुड्डा यानं कोणतेही प्रोस्थेटिक वापरले नाही. आम्ही महाबळेश्वर जवळच्या गावात शूटिंग केलं. माझ्याकडे येण्यापूर्वी रणदीपने या सिनेमासाठी वीर सावरकरांच्या नातवाकडून परवानगी घेतली होती, पण परवानगीची गरज होती, असे मला वाटत नाही. कारण सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. उद्या गांधीजींवर चित्रपट काढला तर परवानगी लागणार नाही.'


रणदीप हुड्डानं सोशल मीडियावर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर काल (28 मे) शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "भारतातील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारक... इंग्रजांनाही सर्वात जास्त भीती वाटायची असं व्यक्तिमत्त्व. या व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य आणि इतिहास जाणून घ्या... 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे". 






रणदीप हुड्डा हा विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. काही दिवसांपूर्वी त्याची महाकाल ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. रणदीपच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Swatantra Veer Savarkar : काळ्या पाण्याची शिक्षा ते सेल्युलर जेलमधील छळ; अंगावर शहारे आणणारा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा टीझर आऊट