Malaika Arora Shared Photo Of Arjun Kapoor: बॉलिवूडची छैय्या छैय्या गर्ल अशी ओळख असलेली  मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या फॅशनमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका ही सध्या अभिनेता  अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच मलायकानं अर्जुनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


मलायकानं शेअर केला अर्जुनचा फोटो 


मलायकानं अर्जुनचा हाफ नेकेड ब्लँक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'माय वेरी ओन लेजी बॉय.' मलायकाचा हा फोटो अर्जुननं रिपोस्ट केला आहे. मलायकानं अर्जुनचा हाफ नेकेड फोटो शेअर केल्यानं सध्या हे कपल चर्चेत आहे.



मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन हे  दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मलायका ही 49 वयाची आहे तर अर्जुन 37 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. 






अर्जुनचे चित्रपट


'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची  विशेष पसंती मिळाली. अर्जुनच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


 मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तसेच ती सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिला  17.6 मिलियन फॉलोवर्स आहे. मलायका काही दिवसांपूर्वी तिच्या डब्बू रत्नानीनं केलेल्या फोटोशूटच्या बीटीएसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नन्सीची अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला अर्जुन, म्हणाला, 'आमच्या वैयक्तिक आयुष्याशी...'