Swara Bhasker : मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) पुन्हा एकदा पडद्यावर परतली आहे. 'जहां चार यार' या चित्रपटातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान अभिनेत्री आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. यावेळी एका मुलाखतीत तिला बॉयकॉट बॉलिवूड या सध्या सुरु असलेल्या ट्रेंड विषयी प्रश्न विचारण्यात आला. स्वरानेही या प्रश्नाला अतिशय बिनधास्तपणे उत्तर दिले आहे. मात्र, यावेळी तिने याचे कारण अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.


स्वरा म्हणाली की, तिचा या अशा ट्रेंडला बढावा देण्यावर अजिबात विश्वास नाही. याशिवाय सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडविरोधात लोकांमध्ये द्वेष वाढल्याचा दावा स्वराने केला आहे. सुशांतच्या आत्महत्येपासून बॉलिवूडला ड्रग्ज आणि अल्कोहोलमध्ये बुडलेले दाखवले जात आहे.


चित्रपट लोकांना रोजगार देतो!


अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली की, 'मला अशा प्रकारची विभागणी आवडत नाही. एक कलाकार म्हणून मला वाटतं की, चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, तर ते सर्वांसाठीच चांगले आहे. एखाद्याचे अपयश साजरे करणे किंवा दुसर्‍याच्या यशाचा मत्सर करणे, खूप मूर्खपणाचे लक्षण आहे. तुम्ही एखाद्या अभिनेत्याला नापसंत करू शकता आणि नेपोटीझमबद्दल बोलू शकता. परंतु, चित्रपट उद्योग प्रत्यक्षात अनेक रोजगार निर्माण करतो. त्यातून लोकांना पैसा मिळत आहे. त्यामुळे अशा ट्रेंडचा गवगवा होऊ नये, असे मला वाटते.’


अनुराग म्हणाला ते पटलं : स्वरा


स्वरा भास्कर तिच्या मुलाखतीत म्हणाली की, तिने नुकतीच अनुराग कश्यपची मुलाखत पाहिली आणि ती त्याच्या मताशी सहमत आहे. अनुरागने सांगितल्याप्रमाणे, देश सध्या आर्थिक मंदीला सामोरा जात असल्याने अशा परिस्थितीत लोकांकडे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत बॉलिवूडला जबाबदार धरणे चुकीचे ठरेल. लोक थिएटरमध्ये न येण्याचे बॉलिवूडच जबाबदार आहे, असे चित्र काही लोक निर्माण करत आहेत.


सुशांतच्या आत्महत्येमुळे राग वाढला!


एकीकडे कोरोना तर, दुसरीकडे ओटीटीचा पर्याय यामुळे लोक थिएटरकडे फिरकत नाहीत, असे स्वराने म्हटले. तर, सुशांतच्या आत्महत्येनंतर ही परिस्थिती आणखीनच बिघडली असल्याचे तिने म्हटले. स्वर म्हणाली की, सुशांतच्या मृत्युनंतर बॉलिवूडला अंध:कारमय ठिकाण म्हणून चित्रित केले जात आहे, जिथे फक्त ड्रग्ज आणि अल्कोहोल आहे. माझा प्रश्न अगदी साधा आहे, 'जर सगळेच तेच करत असतील तर चित्रपट कोण बनवतंय?' दुर्दैवाने बॉलिवूडची बदनामी होत आहे. असे लोक आहेत ज्यांना बॉलिवूड आवडत नाही आणि त्यामुळेच असे ट्रेंड व्हायरल होत असल्याचे तिने म्हटले आहे.


हेही वाचा :


In Pics : ब्लॅक ड्रेसमध्ये स्वराचा बोल्ड अंदाज, चाहते म्हणतात...


Swara Bhasker : उदयपुर प्रकरणावर ट्वीट केल्याने स्वरा भास्कर झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल!