Swara Bhasker : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत एक ट्वीट केले होते. मात्र, या ट्वीटनंतर अभिनेत्री स्वरा भास्करला लोकांनी खूप ट्रोल केले. यानंतर आता अभिनेत्रीने आणखी एक ट्वीट करून अशा लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे.


अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट केले आणि लिहिले की, 'माझ्या टाईमलाईनवर उदयपूरच्या भयंकर आणि राक्षसी घटनेचा तीव्र निषेध करणारे ट्वीट पिन केले आहे. माझा द्वेष करणारे, चिंटू, भक्त, धर्मांध आणि इतर अशा घृणास्पद प्रजाती मला विचारत आहेत की, मी या घटनेवर काय ट्वीट केले आहे का? आधी जा आणि काय लिहीलेय ते वाचा.’ स्वरा भास्कर सुरुवातीपासूनच या प्रकरणावर आपले मत व्यक्त करत आहे. उदयपूरच्या घटनेवरून बराच गदारोळ झाला आहे. उदयपूर हत्याकांडामुळे सोशल मीडियावरही जनक्षोभ पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनीही आपला निषेध व्यक्त केला आहे.


पाहा पोस्ट :



बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही वेगवेगळ्या घटनांवर प्रतिक्रिया मांडते. उदयपूरमध्ये झालेल्या हत्येवर स्वरानं प्रतिक्रिया दिली होती. तिने एक ट्वीट शेअर केले होते. त्या ट्वीटमध्ये स्वराने लिहिले की, 'घृणास्पद आणि निंदनीय, गुन्हेगारांवर कायद्यानुसार तत्परतेने आणि कडक कारवाई झाली पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं... देवाच्या नावाने मारायचे असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. हे अन्यायकारक आहे.'


पाहा पोस्ट :



काय आहे प्रकरण?


उदयपूर शहरात दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एवढेच नाही, तर आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेप्रकरणी भाजपनं राजस्थान बंदची हाक दिली होती. उदयपूरची ही घटना समोर आल्यानंतर राजस्थान सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळं आरोपींना अटक केल्यानंतर तातडीनं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीमध्ये 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ADG अशोक राठोड, ATS आयजी प्रफुल्ल कुमार आणि एक SP आणि एका अतिरिक्त एसपीचा या तपासात समावेश करण्यात आला आहे.


हेही वाचा: