Swara Bhasker Husband: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री   स्वरा भास्कर  (Swara Bhasker) ही काही दिवसांपूर्वी फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. स्वरा ही वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच स्वरानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला स्वरानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


स्वराची पोस्ट


स्वरानं तिचा पती फहाद याचा जवळचा मित्र आरिश कमर याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली. तिनं आरिशचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला स्वरानं कॅप्शन दिलं,  आमचा मित्र, कॉम्रेड आणि फहादचा ओरिजन जोडीदार असणाऱ्या आरिश कमरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आमच्या नेहमी पाठीशी राहिल्याबद्दल आणि अगदी सुरुवातीपासूनच आमची न्यायालयीन कागदपत्रे वेळेत जमा झाल्याची खात्री केल्याबद्दल, आमचा साक्षीदार आणि बेस्ट ‘सौतन’ असल्याबद्दल धन्यवाद!'


स्वरानं या पोस्टमध्ये तिचे फहाद  आणि आरिश यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 






स्वरानं तिच्या आणि फहादच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते.'  स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत हे लग्न झाले आहे, अशी माहिती स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या रिसेप्शन, संगीत आणि मेहंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अनेकांनी स्वरा आणि फहाद यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.


स्वराचे चित्रपट


स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. स्वराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. स्वरा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो स्वरा शेअर करत असते. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Fahad Ahmad: स्वराच्या पतीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाला, "हिंदू-मुस्लिम..."