Fahad Ahmad: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) काही दिवसांपूर्वी फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) कोर्ट मॅरेज केले. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत हे लग्न झाले आहे, अशी माहिती स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. फहाद हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं फहाद आणि तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर अनेकांनी तिला आणि फहादला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता फहादनं एक ट्वीट शेअर करुन ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
स्वराच्या जुन्या ट्वीटमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
स्वराचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये स्वरानं फहादसोबतचा फोटो शेअर करुन लिहिलं होतं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा फहाद मिया! भावाचा आत्मविश्वास असाच राहो. आनंदी रहा. तू म्हातारा होत आहेस, आता लग्न कर!" स्वरानं या पोस्टमध्ये फहादचा उल्लेख 'भावा' असा केला होता. या पोस्टला फहादनं रिप्लाय दिला, "भावाच्या आत्मविश्वासाने झेंडा उंचावला आहे, तो अबाधित राहणे आवश्यक आहे. तू माझ्या लग्नाला येशील असे वचन दिले होते, त्यामुळे वेळ काढा. मुलगी मला सापडली आहे." फहादच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर अनेकांनी फहाद आणि स्वराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
फहादचं ट्वीट
फहादनं नुकतेच एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, "संघाच्या लोकांनी हे मान्य तरी केले की, हिंदू-मुस्लिम भाऊ-बहीण असू शकतात. आता हे मान्य करा की, पती-पत्नी देखील विनोद करू शकतात."
स्वरानं तिच्या आणि फहादच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते.'
स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
महत्वाच्या इतर बातम्या: