TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


अभिनेता किशोर दासचे निधन


आसाम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किशोर दासचे निधन झालं आहे. किशोर दासनं वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. चैन्नईमधील एका रुग्णालयात किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी किशोरनं रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करुन किशोरनं त्याला जाणवत असलेल्या समस्यांबाबत सांगितलं होतं. 


'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार संत कान्होपात्रा!


'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार आहे. 


'स्टेपनी' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी' नंतर आता 'स्टेपनी' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 10 जुलैला दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात विनोदाचा बादशहा भरत जाधव मुख्य भूमिकेत आहे. 


राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर शंभरी


एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाने रिलीजनंतर अनेक रेकॉर्ड केले आहेत. नुकतेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 दिवस पूर्ण केले आहेत. या सिनेमाने फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली नसून संपूर्ण जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस 'आरआरआर' सिनेमा उतरत आहे. 


धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट


दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट झाला आहे. धनुषने टीझर शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


मारहाण झाली, विनयभंगही झाला!, तुरुंगात जाताना केतकी चितळेसोबत काय काय घडलं?


मराठी अभिनेत्री केतकी चितळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. जूनच्या अखेरीस केतकीला जामीन मिळाला, त्यानंतर आता केतकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे जिल्हा कारागृहात नेत असताना आपला विनयभंग झाल्याचे केतकीचे म्हणणे आहे.


'रोडीज' फेम निहारिका तिवारीला जीवे मारण्याची धमकी


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'रोडीज' फेम निहारिका तिवारीला उदयपूरमधील कन्हैयालाल प्रमाणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. निहारिकाने एक व्हिडीओ पोस्ट करत उदयपूरमधील घटनेवर शोक व्यक्त केला होता. या व्हिडीओनंतर निहारिकाला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. इंस्टाग्राम युजर्सने निहारिकाच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय की, 'आता तुझी वेळ आहे.' भिलाई येथील एका तरुणाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 


'जुग जुग जियो'चा विकेंड धमाका; पार केला 100 कोटींचा टप्पा


बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या 'जुग जुग जियो' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहेत. रिलीजच्या आठव्या दिवशी या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.


आदित्य रॉय कपूरच्या 'राष्ट्र कवच ओम'नं दुसऱ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या  राष्ट्र कवच ओम हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. एक जुलै रोजी हा चित्रपट रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.51 कोटींची कमाई केली. तर आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्र कवच ओम या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 1.70  कोटींची कमाई केली आहे. 


'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेकून विश्वजित काका घेणार ब्रेक


'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नेहा-यशचा सुखी संसार नुकताच सुरू झाला आहे. अशातच विश्वजित काका मालिकेतून 21 दिवसांसाठी ब्रेक घेणार आहेत. मालिकेतून ब्रेक घेऊन विश्वजित काका 'कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख' सफर करणार आहेत.