Swanandi Tikekar And Ashish Kulkarni: अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. स्वानंदी आणि आशिष यांचे नुकतेच केळवण पार पडले. त्यांच्या केळवण कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वानंदीनं केळवण कार्यक्रमाच्या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
स्वानंदीनं तिच्या केळवणाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "द काऊंट डाऊन बिगिंन्स, हे सर्व तुमच्या सर्वांपासून सुरू झाले आहे.सुकन्या मोने आम्हाला खास हॅशटॅग दिल्याबद्दल धन्यवाद" स्वानंदीनं # anandi या हॅशगॅटचा उल्लेख देखील पोस्टमध्ये केला आहे.स्वानंदी आणि आशिष केळवणाच्या कार्यक्रमाला खास लूक केला होता. स्वानंदीनं शेअर केलेल्या केळवणाच्या कार्यक्रमाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
काही दिवसांपूर्वी स्वानंदी आणि आशिष यांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन स्वानंदीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "अखेर आम्ही एंगेज झालो आहोत" अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वानंदी आणि आशिष यांना शुभेच्छा दिल्या.
स्वानंदी ही अभिनेता उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar-Tikekar) यांची मुलगी आहे. स्वानंदीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, असं माहेर नको गं बाई, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत तिनं साकारलेल्या मिनल या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
आशिष कुलकर्णी हा गायक आहे. आशिषला इंडियन आयडॉल 12 (Indian Idol 12) या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तो मूळचा पुण्याचा आहे. तो गीतकार देखील आहे. त्याचे स्वतःचे YouTube चॅनल आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: