Sushmita Sen On Lakme Fashion Week : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुष्मिताला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुष्मिता पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली आहे. मुंबईत होत असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये (Lakme Fashion Week) सुष्मिता सहभागी झाली होती. 


'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये (Lakme Fashion Week) सुष्मिताने अनुश्री रेड्डीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 'लॅक्मे फॅशन वीक'च्या मंचावर रॅम्प वॉक करताना सुष्मिता खूपच आनंदी दिसून आली. सुष्मिताचा रॅम्स वॉक करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 






हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुष्मिताने व्यायामाकडे लक्ष दिलं आहे. तिने योगा करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहितीदेखील सुष्मिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. सुष्मिताच्या पोस्टने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 


सुष्मिताचे आगामी प्रोजेक्ट (Sushmita Sen Upcoming Project)


सुष्मिताचा 'ताली' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात सुष्मिता गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. सुष्मिताची 'आर्या 2' ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेबसीरिजमधील सुष्मिताच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं. लवकरच या वेबसीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आर्या 3' ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होईल. सुष्मिताच्या आगामी प्रोजेक्टची चाहते प्रतीक्षा करत आहेत.


'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये अभिनेत्रींचा जलवा (Bollywood Actress In Lakme Fashion Week)


'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये अभिनेत्रींचा जलवा पाहायला मिळाला आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला आहे. यात टीना अंबानीची भाची अंतरा मोतीवाला मारवाह, सोनाक्षी सिन्हा, सान्या मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह, अंशुला कपूर आणि शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाल्या होत्या. 


संबंधित बातम्या


Sushmita Sen : सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टीही झाली, आता सुखरुप