Ghar Banduk Biryani : 'घर, बंदूक, बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या सिनेमातील 'गुन गुन' आणि 'आहा हेरो' ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता लवकरच या सिनेमाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित होणार आहे. 'आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं बॉलिवूडचे लोकप्रिय गायक मोहित चौहान यांनी (Mohit Chauhan) गायलं आहे. 

Continues below advertisement


ए.व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या 'आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...' या गाण्याला वैभव देशमुखचे बोल लाभले आहेत. तर या जबरदस्त गाण्याला बॉलिवूडचे लोकप्रिय गायक मोहित चौहानने आवाज दिला आहे. 


'घर, बंदूक, बिरयानी'चा मेकिंग व्हिडीओ आऊट


'घर, बंदूक, बिरयानी' या गाण्याचा मेकिंगचा व्हिडीओ आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या व्हिडीओमध्ये शूटिंगदरम्यान सिनेमाच्या टीमने केलेली धमाल मस्ती दिसत असून कलाकारांनी, सिनेमाच्या संपूर्ण टीमने पडद्यामागे घेतलेली मेहनतही दिसत आहे. या सगळ्या मेहनतीतूनच या धमाकेदार गाण्याची निर्मिती झाली आहे. चित्रीकरणस्थळ नैसर्गिक वाटावे, यासाठी पडद्यामागच्या कलाकारांनी अनेक आव्हानांना तोंड दिले आहे. पडद्यावर सहज सुंदर दिसणाऱ्या या गाण्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी घेतलेले श्रम या मेकिंगमधून दिसत आहे. 


'आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...' या गाण्याबद्दल बोलताना मोहित चौहान म्हणाले,"मी पहिल्यांदाच मराठीत असं वेगळं गाणं गात आहे. प्रत्येक गायक हा वेगवेगळ्या भाषेत गात असतो. संगीताला भाषेची मर्यादा नसते. त्यामुळे मराठीत गाण्याचाही मी सुंदर अनुभव घेतला. मी अमराठी असल्याने मला भाषेवर थोडं काम करावं लागलं आणि या सगळ्यात मला संपूर्ण टीमने मदत केली". 




मोहित पुढे म्हणाले,"आतापर्यंत मी नागराज मंजुळे यांचं नाव ऐकून होतो. मात्र या सिनेमाच्या निमित्ताने आमची भेट झाली आणि आम्ही एकत्र काम केलं. त्यांचा गाण्याचा अभ्यास, सिनेमाचा अभ्यास बघून मी थक्क झालो. मराठी सिनेसृष्टीला किती प्रतिभावान टीम लाभली आहे, याचा प्रत्यय आला". 


संबंधित बातम्या


Ghar Bandook Biryani: 'आशेच्या भांगेची नशा भारी...'; नागराज मंजुळेंच्या 'घर, बंदूक, बिरयानी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर