Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) 14 जून 2020 मध्ये टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवले. त्याच्या मृत्यूनंतर मोठा गदारोळ झाला. एका बाजूला सिनेसृष्टी हादरली असताना दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सुशांतच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. सुशांतचा आत्मा एक वर्षभर त्रासलेल्या अवस्थेत होता, असा दावा त्याची बहीण श्वेता सिंह कीर्तीने (Shweta Singh Kirti) केला आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये बोलताना तिने सुशांतबद्दल अनेक मोठे दावे केले आहेत. 


'हिंदुस्तान लाईव्ह' या वृत्तसंकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची बहीण श्वेता हिने बराच वेळ ध्यान-साधनेत घालवला. आपला भाऊ गमावल्याचे दुःख तिला सहन होत नव्हते, म्हणून तिने विपश्यनेपासून ते ध्यानसाधनेपर्यंत अनेक गोष्टींचा अवलंब केला. श्वेताने सांगितले की, सुशांतचा आत्मा हा खूप शुद्ध आणि मजबूत आहे. त्याला पाहिजे तेव्हा तो त्यांना त्याची उपस्थिती जाणवू देऊ शकतो. अशा अनेक घटनांचा उल्लेखही तिने केला. इतकंच नव्हे तर आपण सुशांतला कैलास पर्वतावर पाहिले असल्याचे तिने सांगितले. त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्ष त्यांच्या आत्म्याला त्रास झाला होता असा दावाही श्वेता सिंहने केला.


शरीर सोडून कुठं गेला सुशांत?


सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता आता लेखिकाही झाली आहे. तिने Pain (वेदना) नावाचे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये अध्यात्मिक साधना आणि भक्तीचे अनुभव सांगितले आहेत जेणेकरून कोणीतरी आपल्या प्रियजनांपासून विभक्त होण्याचे दुःख सहन करू शकेल. प्रितिका रावच्या पॉडकास्टमध्ये श्वेताने सुशांतबद्दलही भाष्य केले. आपल्या भावाचा आत्मा आता कैलास पर्वतावर असल्याचे तिने सांगितले. 






 


कैलास पर्वतावर खूश आहे सुशांत 


श्वेताने सांगितले की, सुशांत आता कैलास पर्वतावर भगवान शंकरांसोबत आहे. तिथून तो सगळ्यांना पाहतो. सुशांतकडे मोठी ऊर्जा असून कैलास पर्वतावर प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे. तिथे तो खूश असल्याचे दावा तिने केला. आपण कधी कैलास पर्वत पाहिला नाही. पण, सुशांतच्या माध्यमातून कैलास पर्वत पाहिला असल्याचे श्वेताने सांगितले. 


इतर संबंधित बातमी :