Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. या कार्यक्रमाचा कोण विजेता होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान अंकिताला (Ankita Lokhande) थेट सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) बहिणीने पाठिंबा दिला आहे.


सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस'मध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पती विकी जैनसह (Vicky Jain) सहभागी झाली आहे. या कार्यक्रमात सतत त्यांची भांडणे होत असलेली पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे अंकिताला वारंवार सुशांत सिंह राजपूतची आठवण येत आहे. त्यामुळे नेटकरी ट्रोल करत आहेत. दुसरीकडे सुशांतच्या बहिणीने मात्र अंकिताला पाठिंबा दिला आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंहसह (Shweta Singh) बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींचाही अंकिताला पाठिंबा आहे.  


सुशांतच्या बहिणीची अंकिताला सपोर्ट 


सुशांतची बहिण श्वेता सिंहने सोशल मीडियावर अंकिताचा तिच्या आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"अंकिता आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू खूप प्रामाणिकपणे खेळत असून कमाल आहेस". 


राखी सावंतने विकीच्या आईला दिला शांत राहण्याचा सल्ला


राखी सावंत आणि 'बिग बॉस'चं एक वेगळच कनेक्शन आहे. 'बिग बॉस 17' राखी सावंत फॉलो करत आहे. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत अंकिता लोखंडेला पाठिंबा देताना आणि विकीच्या आईला शांत राहण्याचा सल्ला देताना दिसत आहे.
 
राखी सावंत म्हणतेय,"नमस्कार मित्रांनो, मला अंकिताच्या सासूबाईंना सांगायचं आहे की,सासूदेखील कधी सून होती. पती-पत्नीमध्ये तुम्ही कशाला कबाब में हड्डी होत आहात? तुमच्या मुलाने अंकितासोबत आता संसार थाटला आहे. तुम्ही शांत राहा. मजा करा". 


राखी सावंत पुढे म्हणाली,"बिग बॉस 17'ची ट्रॉफी अंकिता लोखंडे जिंकणार आहे. मी आता ही भविष्यवाणी केली आहे. आमची मराठी मुलगी 'बिग बॉस' जिंकणार. त्यावेळी सून जिंकल्यानंतर तुम्हाला वेगळा आनंद होईल. सूनेचा आदर करा. तर तुमच्या मुलीचाही तिच्या सासरी आदर केला जाईल.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या विजेत्याचे नशीब फळफळणार; ट्रॉफी, रोख रक्कमसह मिळणार 'हे' धमाकेदार गिफ्ट