Suriya 42 Motion Poster Released : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या (Suriya) प्रत्येक सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. अशातच सूर्याच्या आगामी 'सूर्या 42' (Suriya 42) या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या सिनेमाचं मोशन पोस्टरदेखील रिलीज करण्यात आलं आहे. 


'सूर्या 42' या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झाल्याने चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. सूर्याचा 'जय भीम' हा सिनेमा गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील सूर्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. तसेच सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे आता 'सूर्या 42' या सिनेमाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 




'सूर्या 42'चे दमदार मोशन पोस्टर रिलीज


सूर्याने 'सूर्या 42' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. मोशन पोस्टर शेअर करत त्याने 'सूर्या 42' संबंधित एक टीझरदेखील शेअर केला आहे. 'सूर्या 42'चे मोशन पोस्टर सध्या चर्चेत आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. पोस्टर शेअर करत सूर्या म्हणाला,"आम्ही शूटिंगला सुरुवात करत आहोत...शुभेच्छा असूद्या'.






सोशल मीडियावर सूर्याची हवा


दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याने आता त्याच्या आगामी 'सूर्या 42' या सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे या सिनेमाची चाहते चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सूर्याच्या मोशन पोस्टरवर चाहते लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'सूर्या 42' या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू असून हा सिनेमा 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  


सूर्याने ‘कादल निम्माधी’, ‘कृष्णा’, ‘श्री’, ‘काका काका’, ‘सिंघम’, ‘निनातू यारो’, ‘अंजान’, ‘कल्याणरामन’, ‘24’, ‘जय भीम’, ‘सूरराय पोतरू’ यासह अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.


संबंधित बातम्या


Happy Birthday Suriya : वडील प्रसिद्ध अभिनेते असतानाही मुलाने केली होती फॅक्टरीत नोकरी! वाचा अभिनेता सूर्याबद्दल...


Jai Bhim : सुपरस्टार सुर्याचा 'जय भीम' चित्रपट अडचणीत; निर्मात्यांवर कथानक चोरीचा आरोप