नवी दिल्ली: 'मिर्झापूर 2' या वेब सीरिजसमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या वेब सीरिजवर विरोधात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या वेब सीरिजचे दिग्दर्शक आणि OTT प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमला नोटिस पाठवली आहे.


या वेब सीरिजवर बंदी आणावी अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामा सुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने या जनहित याचिकेवर सुनावणी घेतली. त्यानंतर या वेब सीरिजचे दिग्दर्शक आणि निर्माते OTT प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमला नोटिस पाठवली आहे.


'कालीन भैया' म्हणतात, "आता बस झाल्या गँगस्टरच्या भूमिका"


या वेब सीरिजच्या माध्यमातून मिर्झापूरची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप करत यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांनीही या वेब सीरिजवर नाराजी व्यक्त केली होती.


Web Series 2020 : 'मिर्झापूर 2' ते 'स्कॅम 1992'... यंदा गूगल सर्चमध्ये या वेबसीरिजचा जलवा


लवकरच 'मिर्झापूर 3' प्रेक्षकांच्या भेटीला
मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. त्यानंतर अॅमेझॉन प्राइमने आता याच्या तिसऱ्या सीजनची घोषणा केली आहे. सीजन 2 मध्ये गंभीर जखमी झालेले कालीन भैया आता तिसऱ्या सीजनमध्ये काय करणार? याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. मिर्झापूर 2 ने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.


पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, हर्षिता शेखर गौड यांनी यामध्ये भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेच्या ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या नुसार, सुमारे 50% प्रेक्षकांनी मालिका प्रदर्शित झाल्याच्या दोनच दिवसांत पाहिली होती. त्याचबरोबर 'मिर्झापूर 2' अवघ्या 7 दिवसांत कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका बनली आहे.


Mirzapur सीजन 3 लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला; कालीन भैयाचं काय झालं? उत्तर मिळणार