मुंबई : अभिनेत्री सनी लियोनी अडचणीत सापडली आहे. सनीने मागील महिन्यात एक मुलगी दत्तक घेतली असून तिचं नाव निशा कौर वेबर ठेवलं आहे. मुलीचा फोटो ट्विटरवर शेअर करताना सनीने आनंद व्यक्त केला होता. सनीच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतुक झालं होतं.


पण आता याच फोटोमुळे सनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय बाल आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन तिला नोटीस पाठवली आहे. सनीवर जेजे कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आयोगाने सनीला 30 दिवसांमध्ये उत्तर देण्याची सूचना केली आहे.

दत्तक घेण्याची प्रक्रिया कोर्टात प्रलंबित असताना मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सनीने गोपनियतेचं उल्लंघन केल्याचं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

सनी लियोनी आणि तिच्या पतीने डॅनियल वेबरने मागील महिन्यात केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणमधून (कारा) निशा नावाच्या 21 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं नाव निशा कौर वेबर ठेवण्यात आलं. सनीला ही मुलगी प्री अडॉप्शनमध्ये देण्यात आली. याचा अर्थ कोर्टात अडॉप्शनची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परंतु त्याआधीच सनी आणि अडॉप्शन एजन्सी काराने निशासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

हे प्रकरण केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधींपर्यंतही पोहोचलं आहे. या प्रकरणात सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीवरही (कारा) जेजे कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला असून त्यांच्याकडून उत्तर मागितलं आहे.

संबंधित बातम्या

सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!


संजू बाबासाठी सनी लिओनीचा नागिन डान्स, व्हिडिओ व्हायरल


‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका


सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर


संंबंधित ब्लॉग


आय लव्ह यू सनी लिओनी!