‘बाबूमोशाय बंदूकबाज’ सिनेमाची स्क्रीप्ट वाचल्यानंतरच यात काम करण्याचा निर्णय घेतल्याचं बिदिता सांगते. विशेष म्हणजे या सिनेमातील इंटिमेट सीन शूट होईपर्यंत बिदिता आणि नवाजुद्दीन सिद्दिकी एकमेकांना नीट ओळखतही नव्हते.
इंटिमेट सीनमुळे चित्रांगदा सिंहने सिनेमाला राम राम केल्याच्या चर्चांवर बोलताना बिदिता म्हणाली, या सिनेमाची स्क्रीप्ट वाचल्यानंतर कुणी सिनेमा न करण्याचा विचारही करु शकत नाही.
याच सिनेमाबाबत बोलताना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणाला, भारतीय संस्कृती 5 हजार वर्षे जुनी आहे आणि त्यात कुठेही सेक्स या विषयाला टॅबू मानलं गेलं नाही. कालिदास यांसारख्यांनी ज्याप्रकारे प्रेमाची परिभाषा सांगितलीय, तसं आजचे कुणीही लेखक करु शकत नाही.
सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेबाबत नवाजुद्दीनला विचारल्यास तो म्हणाला, सध्या इंटरनेटचं युग आहे आणि आजच्या घडीला सर्वकाही प्रेक्षकांच्या हातात आहे. सिनेमातील कोणत्याही सीनवर कट मारणं हास्यास्पद ठरेल.
ट्रेलर पाहा :