Sunny Deol Gadar 3 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर' आणि 'गदर 2' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून प्रेक्षक आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तारा सिंह 'गदर 3'च्या (Gadar 3) माध्यमातून पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवणार आहे.
'गदर' हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचा दुसरा भाग 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण तिसऱ्या भागासाठी प्रेक्षकांना जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. 'गदर 2'च्या यशानंतर सनी देओलचं स्टारडम पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आगामी दिवसांत ते अॅक्शनचा तडका असणारे सिनेमेच करणार आहेत. निर्माते लवकरच 'गदर 3'च्या कामाला सुरुवात करणार आहेत.
'गदर 3' संबंधित 'या' अपडेट्स समोर
- 2024 मध्ये 'गदर 3' या सिनेमाची अधिकृत माहिती समोर येईल.
- आठ महिन्यांनंतर ऑगस्टमध्ये 'गदर 3' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
- 2025 मध्ये स्वातंत्र्यदिनी 'गदर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
'गदर 3' या सिनेमाचं शूटिंग बनारसमध्ये होणार आहे. 14-15 वेगवेगळ्या ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 'गदर 3' या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचा केंद्र नाना पाटेकर असणार असल्याचं समोर आलं आहे.
सब्र का फल मीठा होता हैं : अनिल शर्मा
'गदर 3' या सिनेमाबद्दल बोलताना अनिल शर्मा म्हणाले होते,"गदर 3'साठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल. प्रतीक्षा केल्याचं फळ त्यांना नक्कीच मिळेल. सब्र का फल मीठा होता हैं... 'गदर' आणि 'गदर 2'प्रमाणे 'गदर 3'देखील नक्कीच चांगली कलाकृती असेल...फक्त थोडी वाट पाहा".
'गदर 2' हा सिनेमा पारियड अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. अनिल शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. तिसऱ्या भागाच्या कथानकाबद्दल बोलताना उत्कर्ष शर्मा म्हणाला,"गदर 3' हा सिनेमा जीतेच्या मुलांवर भाष्य करणारा असू शकतो. लेखक सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम करत आहेत".'गदर 3'मध्येही सेम कास्ट असणार आहे. 'गदर' आणि 'गदर 2' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्यामुळे 'गदर 3' किती कोटींची कमाई करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या