Sunny Deol Celebrates Raksha Bandhan With School Girls : बॉलिवूड अभिनेता सनी देओलसाठी (Sunny Deol) हे वर्ष खूपच खास आहे. सनीचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 'गदर 2' प्रदर्शित झाल्यानंतर आलेला पहिला सण अर्थात रक्षाबंधन (Raksha Bandhan) अभिनेत्याने विद्यार्थांसोबत साजरा केला आहे.


सनी देओलचं विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन (Sunny Deol Celebrates Raksha Bandhan With School Girls)


अभिनेता सनी देओलने शाळकरी मुलींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी खास आरतीचं ताट सजवून सनीला ओवाळलं आणि त्याच्या हातावर राखी बांधली. विद्यार्थींनींनी ओवाळल्यानंतर अभिनेत्याने त्यांना ओवाळणीही दिली. तसेच राखी बांधल्यानंतर अभिनेत्याने त्या विद्यार्थीनींनाआशीर्वाद दिला. शाळकरी मुलींसोबत महिला शिक्षिका आणि विद्यार्थीनींच्या आईकडूनही त्याने राखी बांधून घेतली. 






'गदर 2' हा सिनेमा मुंबईतील अंधेरी भागातील विद्यार्थांना सनी देओलच्या उपस्थितीत दाखवण्यात आला. त्याचवेळी त्याने विद्यार्थींनींसोबत रक्षाबंधन साजरं केलं. दरम्यान 'गदर 2'मधील गाण्यांवर उपस्थित असलेल्या विद्यार्थांनी डान्स केला. सिनेमा पाहताना विद्यार्थांनीही 'हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद रहेगा'च्या घोषणा दिल्या. 'गदर 2'च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान सनी देओलही 'मैं निकला गड्डी लेकर' या गाण्यावर थिरकला. 


'गदर 2'च्या निर्मात्यांची प्रेक्षकांसाठी बंपर ऑफर


सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. आता निर्मात्यांनी प्रेक्षकांना रक्षाबंधनाची खास भेट दिली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने 'गदर 2'ची 2 तिकिटे विकत घेतल्यावर 2 तिकिटे मोफत दिली जाणार आहेत. 29 ऑगस्ट 2023 ते 3 सप्टेंबर 2023 पर्यंतच ही ऑफर वैध असणार आहे.


बॉक्स ऑफिसवर तारा सिंहला बोलबाला! (Gadar 2 Box Office Collection) 


'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 284.63 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 134.47 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या 19 दिवसांत आतापर्यंत या सिनेमाने 465.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करेल. 


संबंधित बातम्या


Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' पाहायला गेलेल्या तरुणाचा थिएटरमध्येच मृत्यू; व्हिडीओ व्हायरल