Sunil Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. 90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटींनी ओटीटीची निवड केली आहे. रवीना टंडनने 'आरण्यक' आणि सुष्मिता सेनने 'आर्य' या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले. लवकरच माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टीदेखील ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


सुनील शेट्टीला नेटफ्लिक्सने एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर दिली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेटफ्लिक्सची ही आतापर्यंतची सर्वात मोठी वेबसीरिज असणार आहे. 1960-80 च्या दशकातील मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉनची कथा या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. या वेबसीरिजमध्ये सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत असणार आहेत.





सुनील शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून ओटीटीवर पदार्पण करण्याचा विचार करत होते. ते फिटनेसबाबत खूप सतर्क आहेत. अनेकदा ते वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.  


संबंधित बातम्या


Pushpa Box Office : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ची हिंदींतही कमाल; 80 कोटींची कमाई, 100 कोटींकडे वाटचाल


Malaika Arora-Arjun Kapoor Breakup : अर्जुन कपूर- मलायका अरोराच्या नात्यात दुरावा? ब्रेकअपच्या चर्चेला उधाण


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha