Pushpa Box Office : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तरीदेखील सिनेमा कोट्यवधींची कमाई करतो आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने हिंदींत 80 कोटींचा टप्पा पार केला आहे.





हिंदीत केली 80 कोटींहून अधिक कमाई 
पहिल्या आठवड्यात सिनेमाने 26 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात  20 कोटी कमवले. तर तिसऱ्या आठवड्यात 25 कोटींची कमाई करत सिनेमाने तीन आठवड्यात 72 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमाने 81.58 कोटींची कमाई केली आहे.





पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत होणार प्रदर्शित
पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत प्रेक्षकांना 14 जानेवारी पासून पाहता येणार आहे. तर  7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


संबंधित बातम्या


Selfiee Movie : Akshay kumar आणि Emraan Hashmi च्या 'सेल्फी'चा फर्स्ट लूक रिलीज, करण जोहरने शेअर केला व्हिडीओ


Malaika Arora-Arjun Kapoor Breakup : अर्जुन कपूर- मलायका अरोराच्या नात्यात दुरावा? ब्रेकअपच्या चर्चेला उधाण


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha