Malaika Arora-Arjun Kapoor Breakup : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूरचे (Arjun Kapoor) ब्रेकअप झाले आहे. गेल्या एक आठवड्यापासून दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. अद्याप यासंदर्भात अर्जुन किंवा मलायकाने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनीही त्यांचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 


गेले सहा दिवस मलायका घराबाहेर पडलेली नाही. अर्जुनही तिला भेटायला तिच्या घरी गेलेला नाही. अर्जुन तीन दिवसांपूर्वी त्याची बहीण रिया कपूरच्या घरी जेवणासाठी गेला होता. रियाचे घर मलायकाच्या घरापासून अगदी जवळ आहे, पण तरीही अर्जुन मलायकाला तिच्या घरी भेटण्यासाठी गेलेला नाही. मलायका आणि अर्जुन जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक पार्ट्यांमध्ये दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.





मलायका आणि अभिनेता अरबाज खानचा झाला होता घटस्फोट
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते.  त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.


संबंधित बातम्या


Selfiee Movie : Akshay kumar आणि Emraan Hashmi च्या 'सेल्फी'चा फर्स्ट लूक रिलीज, करण जोहरने शेअर केला व्हिडीओ


Underwater Painting of Pushpa :  अल्लू अर्जुनचा 'जबरा फॅन'; साकारले पुष्पा चित्रपटातील लूकचे अंडर वॉटर पेंटिंग


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha