Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Day 5 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत असला तरी रिलीजच्या पाचव्या दिवशी मात्र कमाईत घसरण पाहायला मिळाली आहे. 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'जवान'चं पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jawan Box Office Collection Day 5)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 75 कोटींची दणदणीत कमाई करत ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटींची कमाई केली. तर रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमाने फक्त 30 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजच्या पाचव्या दिवशी 'जवान'च्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
- पहिला दिवस : 75 कोटी
- दुसरा दिवस : 53.23 कोटी
- तिसरा दिवस : 77.83 कोटी
- चौथा दिवस : 80.1 कोटी
- पाचवा दिवस : 30 कोटी
- एकूण कमाई : 316.16 कोटी
'जवान'ने पाच दिवसांत पार केला 300 कोटींचा टप्पा
शाहरुखच्या 'जवान'च्या कमाईत रिलीजच्या पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळत असली तरी या सिनेमाने पाच दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. पाच दिवसांत या सिनेमाने 316.16 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 520.8 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील शाहरुखचे चाहते त्याच्या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
एटली कुमार (Atlee Kumar) दिग्दर्शित 'जवान' या सिनेमात शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि संजय दत्तची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 5000 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर 'जवान' हा सिनेमा रिलीज झाला आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीदेखील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.
'जवान' या सिनेमाची 300 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आली आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झालाआहे. शाहरुखच्या 'जवान'ने इतिहास रचला आहे. शाहरुख हा इंटरनॅशनल स्टार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पाच दिवसांत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या