Pushpa 2 The Rule: अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 म्हणजेच 'पुष्पा: द रूल'  (Pushpa The Rule) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अल्लू अर्जुननं त्याच्या पुष्पा-2 या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते. आता  'पुष्पा: द रूल'  (Pushpa The Rule) या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. अल्लू अर्जुननं (Allu Arjun)  ट्विटरवर एक खास फोटो शेअर करुन  'पुष्पा: द रूल'  या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.


अल्लू अर्जुननं ट्विटरवर एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा हात दिसत आहे. या हातात  गोल्डन कलरच्या स्टोनच्या अंगठ्या आणि ब्रेसलेट्स घातलेले दिसत आहेत. फोटोमागे अल्लू अर्जुनचा चेहरा दिसत आहे. अल्लू अर्जुननं या फोटोला कॅप्शन दिलं, 'August 15th 2024!!!' पुढच्या वर्षी  स्वातंत्र्य दिनाला 'पुष्पा: द रूल'  (Pushpa The Rule)  हा चित्रपट रिलीज होणार आहे. 






स्ताद सुकुमार दिग्दर्शित आणि मायथ्री मूव्ही मेकर्स निर्मित पुष्पा 2 या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल हे कलाकार काम करणार आहेत. 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला यावर्षाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आता त्याच्या पुष्पा-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


 'पुष्पा: द रूल'  या चित्रपटाचं शूटिंग रामोजी फिल्म सिटीमध्ये झाले आहे.  काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुननं एका खास व्हिडीओच्या माध्यमातून  'पुष्पा: द रूल'  या चित्रपटाची झलक चाहत्यांना दाखवली होती. 


 'पुष्पा: द राइज' चित्रपटाला मिळाली प्रेक्षकांची पसंती 


'पुष्पा: द राइज'  या पुष्पा-2 चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform)  तुम्ही 'पुष्पा: द राइज'  हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामधील डायलॉग्स आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.  'पुष्पा: द राइज'  या चित्रपटामधील ऊ अंटवा, सामी सामी, श्रीवल्ली या गाण्यावर अनेकांनी ठेका धरला. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या झुकेगा नहीं साला या डायलॉगची प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण झाली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Allu Arjun Pushpa 2:   लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन; अल्लू अर्जुननं शेअर केला 'पुष्पा: द राइज'च्या सेटवरील खास व्हिडीओ