Suniel Shetty And KL Rahul: अभिनेता सुनील शेट्टीनं (Suniel Shetty) नुकतीच ANI ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सुनीलनं त्याची लेक अथिया शेट्टीबाबत तसेच त्याचा जावई के.एल. राहुलबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. या मुलाखतीमध्ये सुनीलला के.एल. राहुलला (KL Rahul) सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सुनीलनं या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


काय म्हणाला सुनील शेट्टी?


'जेव्हा के.एल. राहुलला ट्रोल केलं जातं, तेव्हा तुला त्रास होतो का?', असा प्रश्न मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सुनील शेट्टी म्हणाला, " राहुलला ट्रोलिंगचा जितका त्रास होतो त्यापेक्षा जास्त त्रास मला होतो.  राहुल मला ट्रोलिंगबाबत प्रतिक्रिया न देण्यास सांगतो. तो मला म्हणतो,'बाबा माझी बॅट बोलेल' आणि त्याची बॅटच बोलली. लोकांचा त्याच्यावरचा विश्वास, सिलेक्टर्सचा विश्वास, कर्णधाराचा विश्वास, हे सगळं ट्रोलर्सला उत्तरंच आहे. ट्रोलिंगमुळे राहुल किंवा अथियाला जितकं हर्ट होत नाही त्याच्यापेक्षा शंभर पट जास्त मला हर्ट होतं."


बर्ल्ड कपच्या मॅचबाबत सुनिल शेट्टीनं मुलाखतीमध्ये सांगितलं, "संपूर्ण 2023 विश्वचषक स्पर्धेच्या दरम्यान मी आणि माझी  पत्नी, माना आम्ही  एकाच खोलीत बसून मॅच बघत होते.त्या खोलीत आम्ही इतर कोणालाही आत येऊ देत नव्हतो. मी प्रत्येक विश्वचषक स्पर्धेची प्रत्येक मॅच उत्सुकतेने पाहिली"






जानेवारी महिन्यात  अथियाने केएल राहुलसोबत  लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.  अथिया आणि केएल राहुल 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.  


आवारा पागल दिवाना,दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा,धडकन या चित्रपटांमधून सुनील शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीस आला. सुनीलच्या फिटनेसनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे. सुनील हा सोशल मीडियावर त्याचे विविध लूक्समधील फोटो शेअर करतो.


अथियाने या चित्रपटात केलं काम


सुनील शेट्टीची मुलगी अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो' मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये अथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. अथियाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या: 


World cup 2023: भारत वि. ऑस्ट्रेलिया फायनल, जावयावर देशाचं लक्ष, सुनील शेट्टीच्या प्रतिक्रियेने 140 कोटी देशवासियांचं मन जिंकलं!