Dunki Breaks Pathaan Jawan Records : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. किंग खानचा 'डंकी' हा सिनेमा त्याच्याच 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करण्यास सज्ज आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडणार आहे.


शाहरुखचे चाहते 'डंकी' या सिनेमासंदर्भात अपडेट्स जाणून घेण्यास उत्सुक आहेत. पोस्टर, गाणी आणि टीझर या गोष्टींमुळे प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'डंकी' रिलीज होण्याआधीच या सिनेमाच्या कमाईच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. कान्सटिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी नुकत्याच एका मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केलं आहे. 


'डंकी' मोडणार 'पठाण' अन् 'जवान'चा रेकॉर्ड


शाहरुख खान आणि विकी कौशल यांच्या 'डंकी' या सिनेमाला रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. 'डंकी'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. आता या सिनेमासंदर्भात डीएनएला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा म्हणाले,"शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणार आहे. तुम्ही सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला या गोष्टीचा अंदाज येईल". मुकेश छाब्रा यांनी 'डंकी' या सिनेमासंदर्भात याआधीदेखील भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते,"डंकी' हा सिनेमा '3 इडियट्स' या सिनेमापेक्षा 100 पटीने चांगला आहे". 


'डंकी' कधी रिलीज होणार? (Dunki Release Date)


'डंकी' हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहरुखचा बहुचर्चित 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू आणि विकी कौशलदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार हे पाहावं लागेल. 'डंकी' या सिनेमाची प्रभासच्या 'सालार'सोबत टक्कर होणार आहे.


USA मध्ये 'डंकी'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात


'डंकी' या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेक्षक आणि शाहरुखचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यूएसएमध्ये (USA) या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. यूएसएमध्ये हा सिनेमा 320 सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तिथे या सिनेमाचे 915 शो ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत या सिनेमाचे 6514 तिकीट विकले गेले आहेत. सिनेमा रिलीज होण्यात अजून नऊ दिवस बाकी आहेत. त्यामुळे सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आणखी वाढ होऊ शकते. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : 'डंकी'च्या रिलीजआधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला; व्हिडीओ व्हायरल