विराटने वरुण आणि अनुष्काचं खास कौतुक केलं. तसंच सिनेमा जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे. ट्विटमध्ये विराट म्हणतो, “काल रात्री दुसऱ्यांदा सुई धागा सिनेमा पाहिला. तो पहिल्यापेक्षा आणखी जास्त आवडला. या सिनेमात भावनांनी भरलेले सर्वोत्तम अभिनय सर्व टीमने केले आहेत. मौजी म्हणजेच वरुण धवन जबरदस्त आहे. पण ममताच्या (अनुष्का शर्मा) पात्राने मन जिंकलं. तिची क्षमता खूपच सक्षम आणि परिणामकारक असल्यामुळे ती प्रेमात पडण्यास भाग पडते. सो प्राऊड माय लव्ह. सुई धागा चुकवू नका”
दरम्यान, स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान विराट आणि अनुष्काचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्याला खूपच लाईक्स मिळत आहेत.
सुई धागाच्या स्पेशल स्क्रीनिंगला विराट-अनुष्कासह भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज झहीर खान पत्नी सागरिका घाटगेसोबत आला होता. महत्त्वाचं म्हणजे झहीर खाननेही ट्विटरवर आपला सुई-धागाचा रिव्ह्यू जाहीर केला.
'सुई धागा हा सिनेमा पाहायलाच हवा. अनुष्का शर्मा, वरुण धवन आणि सर्व टीमचं अभिनंदन. ममता आणि मौजी उत्तम' असं झहीरने म्हटलं आहे.
विराट आणि झहीरने सोशल मीडियाद्वारे सुई धागाचा आपला आपला रिव्ह्यू सांगितला. आता प्रेक्षकांना तो सिनेमा भावतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.