Subhedar Movie Box Office Collection : 'सुभेदार' (Subhedar) हा बहुचर्चित ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा 'सुभेदार' प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने ते सहकुटुंब हा सिनेमा पाहायला जात आहे. हातात भगवा झेंडा आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत प्रेक्षक 'सुभेदार' सिनेमा पाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


बॉक्स ऑफिसवर 'सुभेदार'ची धमाकेदार कामगिरी (Subhedar Box Office Collection) 


'सुभेदार' हा सिनेमा 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 1.8 कोटींची कमाई केली. त्यानंतर लगेचच वीकेंड आला आणि या सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणखी वाढलं. दुसऱ्या दिवशी 1.8 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 2.30 कोटींची कमाई या सिनेमाने केली. एकंदरीत रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 5.15 कोटींचा गल्ला जमवला आहे. वीकेंडला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आलं आहे. 


छत्रपती शिवरायांच्या परममित्राची (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सुभेदार तानाजी मालुसरेंच्या (Tanaji Malusare) पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या 'सुभेदार' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक सिनेमागृहांत हाऊलफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत प्रेक्षक 'सुभेदार' सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. जल्लोष करत प्रेक्षक सिनेमा पाहत आहेत. हातात भगवा झेंडा घेत शिवरायांच्या घोषणा देताना प्रेक्षक दिसून येत आहेत. दुबईत या सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं.






'सुभेदार' सिनेमाच्या पोस्टरला एका ठिकाणी प्रेक्षकांनी दुधाचा अभिषेक केला आहे. ढोल ताश्याच्या गजरात प्रेक्षकांनी 'सुभेदार' सिनेमाचं चांगलच स्वागत केलं आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar), चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar), मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), अजय पुरकर (Ajay Purkar) ही मंडळी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत.


शिवराज अष्कातील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त','पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' या सिनेमांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आता 'सुभेदार' सिनेमालाही सिनेप्रेमींनी डोक्यावर घेतलं आहे. दिग्पाल लांजेकरचे अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शन प्रेक्षकांना शिवकाळात नेणारे आहे. अजय पूरकर यांनी साकारलेली सुभेदार तानाजी मालुसरेंची भूमिकादेखील उत्तम आहे. सर्व मातब्बर कलाकारांच्या कसदार अभिनयाची छाप या सिनेमावर उमटली आहे.


संबंधित बातम्या


Subhedar Review : 'सुभेदार' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...