Shah Rukh Khan Jawan Advance Booking : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. किंग खानच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची जबरदस्त क्रेझ आहे. 'जवान' हा सिनेमा 'पठाण'चा (Pathaan) रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे. परदेशानंतर आता भारतातही या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला (Jawan Advance Booking) सुरुवात झाली आहे. 


'जवान'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात (Jawan Advance Booking Opened)


'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासाठी सज्ज आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा इतिहास रचणार आहे. बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार,'जवान'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून मुंबईत 'जवान'चे एका मिनिटात 1100 तिकीट विकले गेले आहेत. यूएसएमध्येतर या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 200 डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे. 


भारतासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'जवान' हा सिनेमा छप्परफाड कमाई करणार आहे. अनेक सिनेमागृहांत 'जवान'चे फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल होणार आहेत. 'जवान' हा पॅन इंडिया सिनेमा आहे. हिंदीसह तामिळ आणि तेलुगू भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मुंबईत या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. 


'जवान'बद्दल जाणून घ्या... (Jawan Movie Details)


एटली कुमार (Atlee Kumar) यांनी 'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून एटली कुमार आणि किंग खान यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. या सिनेमात शाहरुखसह दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara), विजय सेतुपती (Vijay Sethupathi), सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra), संजय दत्त (Sanjay Datt) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) कॅमिओ असणार आहे. 


'जवान' कधी प्रदर्शित होणार? (Jawan Release Date)


'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या किंग खानचे चाहते 'जवान'च्या ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. शाहरुख खानचा आजपर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा 'जवान' आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या बिग बजेट सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'जवान'चं पोस्टर, टीझर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा किती धमाका करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या


Jawan : शाहरुख खान इतिहास रचणार! जगातील सर्वात मोठ्या सिनेमागृहात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय सिनेमा 'जवान'