SS Rajamouli : एसएस राजामौली (SS Rajamouli) हे लोकप्रिय सिनेदिग्दर्शक आहेत. आज ते आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राजामौलींनी एका पेक्षा एक सुपरहिट सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यात 'बाहुबली' (Baahubali) ते 'आरआरआर' (RRR) या सिनेमांचा समावेश आहे. 


एस. एस. राजामौलींनी ज्यु. एनटीआर (Jr. NTR) मुख्य भुमिकेत असलेल्या 'स्टुडंट नं. 1' या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून 2001 मध्ये दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले. भारतात हा सिनेमा चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. 


एस.एस. राजामौलींच्या 'मगधीरा', 'एगा', आणि 'बाहुबली: द बिगिनिंग' या सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2016 मध्ये राजामौलींना कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देण्यात आला. त्यांचा पुढील प्रोजेक्ट हा पौराणिक सिनेमा आहे. या सिनेमात महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 


राजामौलींच्या 'या' टॉप 10 सिनेमांना IMDB वर सर्वाधिक रेटिंग


1) बाहुबली 2: द कन्क्लुजन - 8.2
2) बाहुबली: द बीगिनिंग - 8.0
3) RRR - 7.8
4) एगा - 7.7
5) विक्रमारकुदू - 7.7
6) मगधीरा - 7.7
7) छत्रपती - 7.6
8) मर्यादा रामाना - 7.4
9) चॅलेंज - 7.4
10) Simhadri - 7.3


23 वर्षांच्या करिअरमध्ये 12 सुपरहिट सिनेमे


एसएस राजामौली गेल्या 23 वर्षांपासून दिग्दर्शन क्षेत्रात काम करत आहेत. राजामौलींनी दिग्दर्शित केलेल्या सर्वच सिनेमांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं आहे. 23 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 12 सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 


राजामौलींची एकूण संपत्ती 1000 कोटींच्या आसपास आहे. एका सिनेमासाठी ते 200 कोटी रुपयांचं मानधन घेतात. त्यामुळे भारतातील महागड्या दिग्दर्शकांमध्ये त्यांची गणना होते. हैदराबादमध्ये त्यांचं आलिशान घर आहे. राजामौलींच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.


राजामौलींचे गाजलेले सिनेमे


'मगधीरा' हा सिनेमा 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन राजामौलींनी केलं होतं. त्यानंतर त्यांचे यामाडोंगा, ईगा, बाहुबली, बाहुबली 2, आरआरआर असे अनेक सिनेमे चांगलेच गाजले. 


राजामौलींचा 'मेड इन इंडिया' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'मेड इन इंडिया' हा सिनेमा एक बायोपिक आहे. एसएस राजामौलींच्या या बायोपिकची निर्मिती त्यांचा मुलगा कार्तिकेय आणि वरुण गुप्ता करता करत आहे. तर नितीन कक्कड (Nitin Kakkar) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. एसएस राजामौलींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली होती. 






संबंधित बातम्या


Made In India : मेड इन इंडिया! 'RRR'च्या यशानंतर एसएस राजामौलींनी केली नव्या सिनेमाची घोषणा