Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही तिच्या कवितांनी आणि अभिनयांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असते. स्पृहानं नुकतीच वायफळ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या बालपणीच्या आठवणी आणि शाळेबद्दल सांगितलं. 


वायफळ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या आई-बाबांनी दिलेल्या गिफ्टबाबत सांगितलं, 'माझी काकू आजही मला प्रत्येक वाढदिवसाला एक पुस्तक मला गिफ्ट म्हणून देते. मी सहा वर्षाची असताना मला आई-बाबांनी साने गुरुजींच्या गोष्टींचे दहा भाग गिफ्ट म्हणून दिले होते. एकदा दुसरी किंवा तिसऱ्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी खुप कंटाळले होते, तेव्हा मी स्वत:ची लायब्ररी पण केली होती.'


पहिल्या कवितेचा किस्सा



स्पृहानं पहिल्या कवितेचा किस्सा देखील या मुलाखतीमध्ये सांगितलं. ती म्हणाली, 'एका स्पर्धेमध्ये आभ्यास, परीक्षा, टेंशन असे काही शब्द देऊन कविता करायला सांगितली होती. त्या शब्दांचा वापर करुन मी कविता केली. '


शाळेमधील आठवणी सांगताना स्पृहा म्हणाली, 'मी बालमोहन शाळेत शिक्षण घेतलं. मी सेमी इंग्लिशमध्ये शिकले. सेमी इंग्लिशच्या पहिल्या काही लेक्चर्समध्ये काहीच कळाचं नाही. एकदा बाई आम्हाला म्हणाल्या होत्या, फक्त पाठ करा. पायथागोरस तर जीव काढला होता. मी ते आयुष्यात कुठेच वापरलं नाही. मला शाळेत असताना इतिहास विषय आवडत होत. संस्कृत विषय देखील मला आवडायचा. पण  इतिहास हा विषय मला मनापासून आवडत होता.'






स्पृहा ही सध्या  ‘लोकमान्य’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नेव्हर माईंड,पेईंग घोस्ट,बायोस्कोप,लहानपण देगा देवा,नांदी,समुद्र या नाटकांमध्ये स्पृहानं काम केलं. तसेच तिनं मोरया, देवा या चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारली. 


स्पृहानं छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  अग्निहोत्र,आभाळमाया,उंच माझा झोका,एका लग्नाची दुसरी गोष्ट,एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमधील स्पृहाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘उंच माझा झोका’ या मालिकेतील स्पृहाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे तिनं सूत्रसंचालन देखील केलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Spruha Joshi : स्पृहा जोशीची होणारी सासूबाई अवघ्या 23 वर्षांची; नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का