Spider-Man : No Way Home : जगभरात 'स्पायडर मॅन' सिनेमाची चर्चा सुरू आहे. या सिनेमात टॉम हॉलंड मुख्य भूमिकेत आहे. 'स्पायडर मॅन : नो वे होम' (Spider-Man: No Way Home) सिनेमात टॉम हॉलंड स्पायडर मॅनच्या भूमिकेत आहे. कोरोनानंतर लोकप्रियतेचं शिखर गाठणारा हा पहिलाच सिनेमा आहे. कोरोनानंतर हा सिनेमा बॉक्सऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडतो आहे. 


'स्पायडर मॅन' सिनेमाने अनेक विक्रम केले आहे. हा सिनेमा लवकरत अर्धा अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. अमेरिकेतदेखील सिनेमाला प्रचंड यश मिळते आहे. परदेशात तीन दिवसात या सिनेमाने 300 दशलक्षचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाकाळात असा विक्रम करणारा हा पहिला सिनेमा ठरला आहे.


 


'स्पायडर मॅन : नो वे होम' हा चित्रपट 16 डिसेंबरला भारतात प्रदर्शित झाला असून यूएस थिएटरमध्ये हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. जॉन वॉट्सने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे स्पायडर मॅनच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये जात आहेत. या सिनेमातील टॉम हॉलंडच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


संबंधित बातम्या


Spider-Man: No Way Home Trailer: स्पायडर मॅन: नो वे होम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; जबरदस्त अ‍ॅक्शन व्हिडिओ पहा


Sports movies : क्रिकेट चाहत्यांसाठी ट्रीट, बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणार बिग बजेट सिनेमे


Zareen Khan : मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याला जरीन खानचं समर्थन, प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांनाही सुनावलं


Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल


Spider-Man: No Way Home Trailer: स्पायडर मॅन: नो वे होम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; जबरदस्त अ‍ॅक्शन व्हिडिओ पहा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha