PHOTO : शुभ मंगल... सावधान! साऊथ अभिनेत्री नयनतारा अडकली विवाह बंधनात, पाहा फोटो
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी लग्नगाठ बांधून, आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. या दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटोज नुकतेच समोर आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये नयनतारा आणि विघ्नेश शिवन खूपच क्यूट दिसत आहेत. दोघांनी एकमेकांना सात वर्षे डेट केले होते आणि आता त्यांनी त्यांच्या नात्याला पती-पत्नीचे नाव दिले आहे.
नयनताराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहेत.
एका फोटोत विघ्नेश शिवन त्याची नवविवाहित पत्नी नयनताराच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे.
नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी लग्नाच्या विधीदरम्यान खूप धमाल केली. एकमेकांना हार घालताना दोघांची खट्याळ शैली समोर आली आहे.
विघ्नेश शिवनने लग्नात नयनताराला मंगळसूत्र घातले तेव्हाचा क्षण लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा विवाह चेन्नईच्या महाबलीपुरम येथे कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झाला. (Photo : Nayanthara/IG)