Nayanthara-Vignesh : साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली होती. चेन्नईत झालेल्या ग्रँड लग्न सोहळ्यानंतर हे जोडपे विशेष चर्चेत होते. आता लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच, दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नयनतारा आणि विग्नेश ही जोडी जुळ्या मुलांची पालक झाली आहे. नुकतीच विग्नेश शिवन याने सोशल मीडियावर नयनतारासोबत मुलांच्या पायाचे चुंबन घेतानाची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर नयनतारा आणि विग्नेश्वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विग्नेश शिवन यानेने सोशल मीडियावर चार फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो आणि नयनतारा मुलांच्या छोट्या पावलांचे चुंबन घेताना दिसत आहेत, तर कधी त्यांच्यासोबत खेळताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नयन आणि मी अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्हाला जुळे मुलगे झाले आहेत. आपल्या सर्वांच्या प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद या दोन जुळ्या मुलांच्या रूपाने आमच्या आयुष्यात आले आहेत. आता उईर आणि उलगमसाठी तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची आणि प्रर्थानांची गरज आहे.’
पाहा पोस्ट :
चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
विग्नेशने मुलांच्या पायांशिवाय नयनताराचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने चिमुकल्या बाळाचा पाय धरलेला दिसत आहे. दोघेही आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील या फोटोंवर नयनताराचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. विग्नेश आणि नयनतारा आई-बाबा झाल्याबद्दल चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
लग्नाच्या अवघ्या चार महिन्यात गुडन्यूज
विग्नेश शिवनच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहते या जोडीवर आणि त्यांच्या नवजात बाळांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मात्र, लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच नयनतारा आणि विग्नेश आई-वडील झाल्याबद्दलही काही चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, साऊथच्या या स्टार जोडप्याने सरोगसीच्या माध्यमातून आपल्या जुळ्या मुलांचे या जगात स्वागत केले असावे, अशी अटकळ चाहते बांधत आहेत.
कामात व्यस्त असतानाही करणार बाळांचं संगोपन
अभिनेत्री नयनतारा सध्या अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, त्याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत झळकणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते अॅटली देखील पहिल्यांदाच किंग खान आणि नयनतारा या जोडीसोबत काम करत आहेत. याशिवाय नयनताराकडे अल्फोन्स पुथरेन आणि पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित 'गोल्ड' आणि 'कनेक्ट' नावाचे आगामी तमिळ चित्रपट देखील आहेत. तर, चित्रपट निर्माता असलेल्या विग्नेश शिवन याने नुकतीच अजितचा 62 वा चित्रपट दिग्दर्शित करण्याची घोषणा केली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :