Nayanthara,Vignesh Shivan : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री  नयनतारा  (Nayanthara) आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022  रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. सध्या नयनतारा आणि विघ्नेश हे स्पेनमध्ये  हनीमून साजरा करत आहेत. पण हनीमूनसाठी त्यांनी एकही रुपया खर्च केलेला नाही. मग हा खर्च कोण करत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल? जाणून घेऊयात त्याबद्दल...


स्पेनमध्ये सध्या नयनतारा आणि  विघ्नेश हे त्यांचा हनीमून साजरा करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनतारा आणि विघ्नेश हे ज्या हॉटेलमध्ये राहात आहे त्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे सुमारे अडीच लाख रुपये आहे. पण नयनतारा आणि विघ्नेश हे एकही रुपया खर्च न करताना त्यांचा हनीमून साजरा करणार आहेत. मग हा खर्च कोण करत आहे? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असेल. तर याचं उत्तर ‘नेटफ्लिक्स’हे आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंपनीनं नयनतारा आणि विघ्नेश यांच्या हनीमूनला स्पॉन्सर केलं आहे. नयनतारा आणि  विघ्नेश यांच्या विवाह सोहळ्याची डॉक्युमेंट्री 'नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल' ही नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ही डॉक्युमेंट्री प्रमोट करण्यासाठी नेटफ्लिक्सनं नयनतारा आणि विग्नेश यांच्या हनीमूनला स्पॉन्सर केलं आहे.  


नयनतारा आणि विघ्नेश हे स्पेनमधील त्यांचे रोमँटिक पोजमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 30 सप्टेंबर रोजी नयनतारा आणि  विघ्नेश यांच्या विवाह सोहळ्याची डॉक्युमेंट्री 'नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल' ही नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.


गेल्या वर्षी नयतारा आणि विग्नेश यांचा गेल्या वर्षी साखरपुडा झाला. नयनतारानं 25 मार्च 2021 रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली.नानुम राउडी धन या चित्रपटासाठी नयनतारा आणि विग्नेश यांनी एकत्र काम केलं होतं.  नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'काथुवाकुला रेंदू कादल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विघ्नेशने केले होते. तर नयनतारा, विजय सेतुपती आणि समंथा रुथ प्रबू या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: