Goodbye Box Office Day 2: नॅशनल क्रश अशी ओळख असणारी अभिनेत्री रश्मिका मंदना  (Rashmika Mandanna)  आणि अभिनेते  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'गुडबाय' (Goodbye)  हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची  विक्रम वेधा आणि  'पोन्नियिन सेलवन' या दोन चित्रपटांबरोबर बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं दुसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


दोन दिवसात केली एवढी कमाई


रिपोर्टनुसार, 'गुडबाय' या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी जवळपास 1.2 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या शनिवारी (8 ऑक्टोबर) या चित्रपटानं 1.5 कोटींचे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केलं आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 2.7 कोटींची कमाई केल आहे. रविवारी हा चित्रपट चांगली कमाई करु शकतो, असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


तगडी स्टार कास्ट


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि रश्मिका यांच्यासोबतच नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी यांनी देखील गुडबाय या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. रश्मिकानं या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकरली आहे. या बाप-लेकीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले होते. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


रश्मिकाच्या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती


गीता गोविंदम आणि सीता रामम यांसारख्य अनेक दाक्षिणात्य चित्रपटातील ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेल्या रश्मिका मंदान्नानं गुडबाय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या पुष्पा: द राइज या सुपरहिट चित्रपटातील तिच्या श्रीवल्ली या भूमिकेनं अनेकांची मनं जिंकली. रश्मिकासोबतच या चित्रपटात अल्लू अर्जुननं देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.  आता तिचा गुडबाय हा चित्रपट हिट ठरतो की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: