मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा 60वा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब लंडनमध्ये हजर होतं. अनिल यांच्या बर्थ डे पार्टीत भाऊ संजय कपूर, मुलगी सोनम कपूर, रिया कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन आणि मोहित मारवाह यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.
पण वडिलांच्या बर्थ डे पार्टीत आकर्षण ठरली ती सोनम कपूर. या पार्टीत सोनम कपूर तिचा कथित बॉयफ्रेण्ड आनंद आहूजासोबत दिसली. सोनम आणि आनंदचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी रिया कपूरनेही एक फोटो शेअर केला होता, ज्यात कपूर कुटुंबासह आनंद अहुजाही हजर होता.
सोनम आणि आनंद बऱ्याचदा एक दिसतात. सोनम आणि आनंद दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतं. पण दोघेही त्यांच्या रिलेशनशिपबाबत कधीही उघडपणे बोलले नाहीत.
दरम्यान 'नीरजा' सिनेमासाठी 'एडिटर्स चॉईस बेस्ट अॅक्ट्रेस ऑफ द ईयर' हा पुरस्कार मिळाला होता.