Sonam Kapoor Music Store Deal : अभिनेत्री सोनम कपूर सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तर ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, याचं कारण तिचा आगामी प्रोजेक्ट नसून वेगळंच आहे. सोनम कपूरने कर्जबुडव्या नीरव मोदीची मालमत्ता खरेदी केली आहे. अभिनेत्री सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबत मिळून फरार नीरव मोदीचं 'रिदम हाउस' हे आयकॉनिक म्युझिक स्टोअर विकत घेतलं आहे.


सोनम कपूरने खरेदी केलं कर्जबुडव्या नीरव मोदीची मालमत्ता 


अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजाची कंपनी भाने ग्रुपने नीरव मोदीच्या मालकीचं रिदम हाऊस म्युझिक स्टोअर खरेदी केलं आहे. रिदम हाऊस हे देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचं आयकॉनिक म्युझिक स्टोअर आहे. रिदम हाऊस  किंमत 4,784 लाख रुपये आहे. 3600 चौरस फुटांचे रिदम हाऊस 2018 पासून बंद होतं. फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचा मालक नीरव मोदी कर्जबूडवून देशातून पळून गेल्यापासून रिदम स्टोअर बंद आहे. आता हे म्युझिक स्टोर सोनम आणि आनंदने विकत घेतलं आहे.


रिदम हाऊस म्युझिक स्टोअरची खरेदी


नीरव मोदी भारतातून पळाल्यानंतर रिदम स्टोअर भारतीय दिवाळखोरी न्यायालयाच्या देखरेखीखाली होते. त्यानंतर आता हे स्टोअर सोनम कपूर आणि आनंद आहुजाची कंपनी भाने ग्रुपच्या मालकीचं झालं आहे.  भारतीय दिवाळखोरी न्यायालया हा कराराची माहिती ब्लूमबर्गला दिली आहे. फायरस्टारच्या मालमत्तेच्या विक्रीवर देखरेख करणारे अधिकारी शंतनू टी रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हितधारक समितीने रिदम हाऊसच्या 4,784 लाख रुपयांना विक्री करण्यास मान्यता दिली आहे.'






आनंद आहुजाचे वडील कंपनीचे मालक


सोनम कपूर आणि आनंद आहुजाची कंपनी भाने ग्रुप त्यांच्या लेबलखाली कपडे तयार करते. भाने ग्रुप हा आनंद आहुजा यांच्या वडिलांच्या कंपनी शाही एक्सपोर्ट्स प्रा. ही कंपनी यांच्या मालकीची कंपनी आहे. भाने ग्रुप  भारतातील सर्वात मोठ्या कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे, ही कंपनी आंतरराष्ट्रीय ब्रँडना देखील कपड्यांचा पुरवठा करते.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan : सलमान खानकडे पाच कोटी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, झारखंडमधून आरोपीला बेड्या