Sonali Bendre : आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सोनाली बेंद्रेच्या (Sonali Bendre) नावाचा समावेश आहे. सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहलच्या (Goldie behl) सुखी संसाराला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. सोनालीने गोल्डीसोबतचे खास फोटो शेअर चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 


सोनालीला तिच्या कठीण काळात तिच्या नवऱ्याने खूप साथ दिली आहे. कॅन्सरवरील उपचारकाळात गोल्डी सतत सोनाली सोबत होता. सोनालीने सोशल मीडियावर तिच्या कॅन्सर संबंधित अपडेट शेअर करत असताना गोल्डीसोबतचे क्षणदेखील शेअर केले आहेत. सोनालीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.  






सोनाली आणि गोल्डीची भन्नाट लव्हस्टोरी!


एका सिनेमाच्या सेटवर गोल्डीने सोनालीला पहिल्यांदा पाहिलं. पहिल्या नजरेतच तो सोनालीच्या प्रेमात पडला. त्याने सोनालीशी फर्ल्ट करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्यानंतर 'अंगारे' या सिनेमाच्या चर्चेसाठी गोल्डी सोनालीच्या घरी गेला. तेव्हा त्याचा चांगला पाहुणचार झाला. पुढे याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 


सोनाली बेंद्रे 'मिशन सपने', 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'इंडियाज बेस्ट ड्रामे बाज' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'हम साथ साथ है', 'चल मेरे भाई' आणि 'लज्जा' या सिनेमातील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 4  जुलै 2018 रोजी सोनालीनं सोशल मीडियावर तिला कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. सोनाली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या पोस्ट आणि फोटो ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. 


सोनाली आणि गोल्डी यांच्या मुलाचे नाव रणवीर असे आहे. गोल्डी हा सिने-निर्माता असण्यासोबत उत्कृष्ट दिग्दर्शकदेखील आहे. 'बस इतनासा ख्वाब है' या सिनेमाच्या माध्यमातून सोनालीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सोनाली बेंद्रे ही 90 च्या दशकातली लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती जाहिरात आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 


संबंधित बातम्या


Sonali Bendre Cancer Hospital : 'चार वर्षानंतर...'; सोनालीनं दिली रुग्णालयाला भेट, आठवणींना उजाळा