Charcha Tar Honarach : मनोरंजन विश्वात नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा रंगत असते. चर्चेत राहण्यासाठी सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण सध्या नाटयवर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. आदिती सारंगधर (Aditi Sarangdhar), क्षितिज झरापकर (Kshitij Zarapkar) आणि आस्ताद काळे (Aastad Kale) एकत्र आल्याने ही चर्चा होत आहे. हे त्रिकुट 'चर्चा तर होणारच' (Charcha Tar Honarach) या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.


चर्चेत राहण्यासाठी आम्हाला सिर्फ नाम ही काफी हैं... ‘चर्चा तर होणारच’, असं म्हणत रंगभूमीवर खमंग ‘चर्चा’ घडवायला येत असलेल्या या नाटकाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 'चर्चा तर होणारच' हे नर्मविनोदी अंगाने सामजिक भाष्य करणार खुसखुशीत नाटक आहे. 


'चर्चा तर होणारच’ नाटकाचं कथानक काय?


'प्रपोझल' या नाटकानंतर आदिती सारंगधर आणि आस्ताद काळे ही जोडी सातवर्षाने 'चर्चा तर होणारच’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर एकत्र येत आहे. एका स्पर्धेच्या निमित्ताने घडणारं चर्चासत्र त्यात बाजी मारण्यासाठी झालेल्या युक्त्या, कुरघोड्या आणि त्यातून रंगणारं धमाल,क्लासिक,मिश्किल नाटक म्हणजे 'चर्चा तर होणारच'. 


'चर्चा तर होणारच’ या नव्या नाटकाचा शुभारंभ 19 नोव्हेंबर शनिवार सायं 5 वाजता बालगंधर्व, पुणे येथे होणार आहे. तर 20 नोव्हेंबर रविवार रात्रौ 8.30वा. ठाणे येथील गडकरी रंगायतनला दुसरा प्रयोग सादर होईल.






'चर्चा तर होणारच’ ही नाट्यकृती हेमंत एदलाबादकर यांची आहे. हेमंत एदलाबादकर यांनीच या नाटकाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी या नाटकाचे निर्माते आहेत. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य तर अमोघ फडकेने प्रकाशयोजना केली आहे. तर या नाटकाला राहुल रानडेंनी संगीत दिलं आहे. 


नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!


वेगवेगळ्या धाटणीची नव-नवीन नाटकं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात विजय केंकरेंच्या  ‘यू मस्ट डाय,’ ‘काळी राणी’ व ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या तीन रहस्यप्रधान नाटकांचा समावेश आहे. ‘जाऊ बाई जोरात’च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. . ‘चर्चा तर होणारच,’ ‘करायचं प्रेम तर मनापासून,’ ‘मास्टर माईंड,’ ‘संभ्रम’ यांसारख्या नवीन नाटकांसोबतच ‘ती परी अस्मानीची’ हे बालनाट्यही लवकरच येणार आहे.  ‘संगीत अवघा रंग एक झाला’ हे जुने नाटकही नव्या संचात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर