Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : 'हीरामंडी' (Heeramandi) या वेबसीरिजमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री आपला बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत (Zaheer Iqbal) येत्या 23 जूनला लग्नबंधनात अडकू शकते. रिपोर्टनुसार, सोनाक्षी आणि जहीर खाजगी पद्धीतीत लग्नबंधनात अडकणार आहेत. निवडक पाहुण्यांना या लग्नसोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. सोनाक्षीच्या लग्नसोहळ्याला 'हीरामंडी' (Heeramandi) सीरिजच्या संपूर्ण टीमची विशेष उपस्थिती असणार आहे. अद्याप लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत. नाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, सोनाक्षी आणि जहीर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 


जहीर इकबालला सलमानने केलंय लॉन्च


जहीर इकबाल हा सलमा खानचा बालपणीचा मित्र इकबाल रतनसी याचा मुलगा आहे. त्यामुळे सलमानने आपल्या प्रोडक्शन बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या 'नोटबुक' (Notebook) या चित्रपटाच्या माध्यमातून लॉन्च केलं होतं. या चित्रपटाच्या माध्यमातून मोहनीश बहल यांची लेक प्रनूतन हिनेदेखील पदार्पण केलं होतं. पण दोघेही जादू दाखवण्यात कमी पडले.


'असं' आहे सोनाक्षीचं करिअर


जहीरला सोनाक्षीने लाँच केलं होतं. दुसरीकडे सलमाननेच सोनाक्षीला तिच्या करिअरमधला 'दबंग' हा पहिला चित्रपट फ्लॉप झाला होता. पहिल्याच चित्रपटाने सोनाक्षीला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. त्यानंतर तिच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. अभिनेत्री आजवर अनेक चांगल्या चित्रपटांचा भाग आहे. सोनाक्षी नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या सीरिजमध्ये दुहेरी भूमिकेत झळकली होती. सोनाक्षीची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. सोनाक्षी अनेक दिवसांपासून लग्नाचं प्लॅनिंग करत आहे. सोनाक्षीच्या लग्नासह तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. जहीरआधी सोनाक्षी अर्जुन कपूरला डेट करत होती. जहीर आणि सोनाक्षीची लग्नपत्रिकादेखील खूप खास आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या


Bollywood Flop Star Kid Actor : वडील बॉलिवूडचे सुपरस्टार, बहिणीनेही नाव कमावलं, 'या' अभिनेत्यावर नशीब रुसलं; पहिल्या फ्लॉपनंतर 13 वर्षांनी मिळालं यश