Ajay Devgn Son of Sardaar 2 : अभिनेता अजय देवगण याचा आगामी सन ऑफ सरदार 2 चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाची शूटींग सुरु असून  या चित्रपटातून अभिनेता विजय राज याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. विजय राज याचा सेटवरील गैरवर्तनामुळे त्याला चित्रपटातून काढल्याचं मिडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. मात्र, विजयने हे दावे फेटाळले असून यामागचं कारण अजय देवगण असल्याचं म्हटलं आहे.


विजय राजला 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटातून बाहेरचा रस्ता


ॲक्शन कॉमेडी चित्रपट सन ऑफ सरदारच्या (Son of Sardaar 2) सीक्वेलची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सध्या या चित्रपटाचं शुटींग सध्या युकेमध्ये सुरु आहे. अभिनेता संजय दत्तला युकेचा व्हिसा नाकारण्यात आल्यानंतर तो या चित्रपटातून बाहेर झाला आहे. चित्रपटाचं शुटींग सुरु झाल्याची माहिती अजय देवगण याने दिली होती. त्यानंतर आता या चित्रपटातून आणखी एक अभिनेत्याचा पत्ता कट झाला आहे.


निर्मात्यांनी सांगितलं सेटवर नेमकं काय घडलं?


सन ऑफ सरदार 2 चित्रपटाचे सहनिर्माते कुमार मंगत पाठक यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितलं आहे की, "होय, हे खरे आहे की, विजय राज याला सेटवरील वागणुकीमुळे आम्ही त्यांना चित्रपटातून काढलं आहे. त्यांनी मोठी रुम, व्हॅनिटी व्हॅन अशा अनेक गोष्टींची मागणी केली होती. त्याच्या स्पॉट बॉयला प्रति रात्र 20 हजार रुपये फी दिली जात होती, जे कोणत्याही मोठ्या अभिनेत्यापेक्षा जास्त आहे. यूके हे एक महाग ठिकाण आहे आणि शूट दरम्यान प्रत्येकाला चांगल्या हॉटेल रूम दिल्या गेल्या होत्या, पण त्याने प्रीमियम सूटची मागणी केली गेली. त्यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत होत्या.". पिंकविलाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.






 


वाढत्या मागण्या, कर्मचाऱ्यांशी वाईट वागणूक


कुमार मंगत यांनी पुढे सांगितलं की, "जेव्हा त्यांनी विजय राज यांच्याशी महागड्या खोलीच्या भाड्याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने काहीही समजण्यास नकार दिला आणि तो वाईट स्वरात बोलला. विजय राज म्हणाला की, चित्रपटासाठी तुम्ही लोक माझ्याशी संपर्क साधलात, मी समोरून काम मागितलं नव्हतं. कुमार मंगत पाठक म्हणाले, 'आम्ही त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना, त्याच्या मागण्या कधीच संपत नव्हत्या आणि त्याचं वर्तन खराब होत गेलं. तीन कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी त्याने दोन गाड्यांची मागणी केली. आपण हे कसे करू शकतो? कार्यकारी निर्मात्याने याला नकार दिल्यावर त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केलं. अनेक चर्चेनंतर आम्ही त्याला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला".


अजय देवगण मूळ कारण असल्याचा विजय राजचा दावा 


दरम्यान, यानंतर आता अभिनेता विजय राज याची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी हे दावे फेटाळले आहेत. विजय राजने दावा केला आहे की, "मी ट्रायलसाठी वेळेत ठिकाणी पोहोचलो. मी व्हॅनजवळ पोहोचलो आणि रवी किशन मला भेटायला आला. ईपी, आशिष आणि निर्माता कुमार मंगत मला भेटायला आले, त्यानंतर दिग्दर्शक विजय अरोरा आले. मी व्हॅनमधून बाहेर आलो, आणि अजय देवगण 25 मीटर अंतरावर उभा असलेला दिसला. मी व्यस्त असल्याने मी त्याला नमस्कार करायला गेलो नाही आणि जवळच्या मित्रांशी बोलत राहिलो. 25 मिनिटांनी कुमार मंगत माझ्याकडे आले आणि म्हणाले की, आम्ही तुला बाहेर काढत आहोत".


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का बोर व्हायला लागलाय, रितेशनं होस्टिंग बंद करायला हवी, महेश मांजरेकरच हवे होते; प्रेक्षक वैतागले, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर