Tanushree Dutta On Vivek Agnihotri: बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) ही कायमच तिचं स्पष्ट मत मांडत असते. सध्या ती अभिनयापासून जरी दूर असली तरी ती तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने नाना पाटेकर आणि राखी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचप्रमाणे तिने मी टूमध्येही नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता तिने द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. 


सेटवर विविके अग्निहोत्रीचं वागणं, तिच्याशी बोलणं या सगळ्यावर तनुश्रीने भाष्य केलं आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्री आणि नाना पाटेकर यांसारख्या लोकांमुळे माझं करिअर संपलं असा गंभीर आरोपही तिने केला आहे. त्यांनी माझं करिअर संपवून आता स्वत:च्या सिनेमासाठी त्यांना पुरस्कार मिळत असल्याचाही गंभीर आरोप तनुश्रीने केला आहे. त्याचप्रमाणे तो मला शॉर्ट स्कर्टमध्ये पूर्ण युनिटसमोर बसवायचा असाही आरोप त्याने केला आहे. 


'तो माझ्यावर कायम ओरडायचा'


तनुश्रीने म्हटलं की, 'सेटवर पोहोचल्यानंतर आम्ही 100 दिवस सतत शूटिंग केलं. मी सगळ्यात आधी सेटवर पोहोचायचे.  कधी कधी असं व्हायचं की मी आधी पोहोचायचे, तेव्हा सेटवर लाईट्स नसायचे, सेट तयार नसायचा. पण एक दिवस मी सेटवर पाच मिनिटे उशिरा आले, म्हणून मी आले की नाही हे पाहण्यासाठी तो सेटवर होता. त्या दिवशी तो माझ्यावर खूप ओरडला. 


पुढे तिने म्हटलं की, त्याला मला त्रासच द्यायचा होता. तो मला संपूर्ण वेळ सेटवर बसवून ठेवायचा. माझा जेव्हा शॉट नसायचाही तेव्हाही तो मला सेटवरच बसवून ठेवायचा. मला व्हॅनमध्येही जायला परवानगी नव्हती. ऊन असो, ऊन असो वा पाऊस, जर मी व्हॅनमध्ये थोडावेळ गेले की तो कुणालातरी पाठवून मला बोलवायला सांगायचा. 


'जेव्हा कलाकार शूटिंग करत नसतात तेव्हा ते व्हॅनमध्ये आराम करतात. जर तुम्ही मला लहान कपडे दिले असतील आणि मी स्वत:ला कन्फर्टेबल राहण्यासाठी व्हॅनमध्ये जाऊच शकते. कधी कधी त्या शॉर्ट स्कर्टवर रोब घालायचे तेव्हा मला म्हणायचा की ते काढ आता सीन आहे. तो मला दिवसभर शॉर्ट स्कर्टमध्ये संपूर्ण युनिटसमोर बसवायचा, असं म्हणत तिने विवेक अग्निहोत्रीवर गंभीर आरोप केले आहेत. 






ही बातमी वाचा : 


Gulmohar Movie : राष्ट्रीय पुरस्कारावर 'गुलमोहर'ची मोहोर; शर्मिला टागोर, अमोल पालेकर यांच्या मुख्य भूमिका