Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असणाऱ्या सोहेल खानचा (Sohail Khan) आज वाढदिवस आहे. 20 डिसेंबर 1970 रोजी महाराष्ट्रात सोहेलचा जन्म झाला. सोहेल हा बॉलिवूडचे लोकप्रिय पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. तसेच तो सलमान खानचादेखील भाऊ लागतो. 


सोहेलने 1997 साली 'औजार' (Auzaar) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमात संजय कपूर (Sanjay Kapoor), सलमान खान (Salman Khan) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्याने 1998 साली 'प्यार किया तो डरना क्या' (Pyaar Kiya To Darna Kya) या सुपरहिट सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. तसेच तो या सिनेमाचा निर्मातादेखील होता. या सिनेमात सलमान खान (Salman Khan), अरबाज खान (Arbaaz Khan), काजोल (Kajol) आणि धर्मेंद्र (Dharmendra) मुख्य भूमिकेत होते. 


'अशी' झाली अभिनय प्रवासाला सुरुवात (Sohail Khan Acting Journey) : 


सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी झाल्यानंतर सोहेलने 2002 साली 'मैंने दिल तुझको दिया' (Maine Dil Tujhko Diya) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून पदार्पण केलं. या सिनेमात अभिनय करण्यासोबत सोहेलने सिनेमाचं दिग्दर्शन, निर्मिती आणि पटकथालेखक म्हणूनदेखील काम केलं. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा आपली जादू दाखवण्यात कमी पडला. 


डरना मना हैं (Darna Mana Hai), कृष्णा कॉटेज (Krishna Cottage), आर्यन (Aryan), हीरोज (Heroes), गॉड तुस्सी ग्रेट हो (God Tussi Great Ho), लवयात्री (Loveyatri) अशा अनेक सिनेमांत सोहेल अभिनेता म्हणून झळकला आहे. तर हेलो ब्रदर (Hello Brother), पार्टनर (Partner), गॉड तुस्सी ग्रेट हो आणि रेडी सारख्या काही सिनेमांची त्याने निर्मिती केली आहे. तसेच यातील हेलो ब्रदर, मैंने दिल तुझको दिया आणि जय हो सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन सोहेलने केलं आहे. सिनेमांसह सोहेलने छोट्या पडद्यावरील 'कॉमेडी सर्कस का नया दौर' (Comedy Circus Ka Naya Daur) या लोकप्रिय कार्यक्रमाचं परीक्षणदेखील केलं आहे.


प्रेम, पळून जाऊन लग्न ते विभक्त होणं....


सोहेल खानने सीमासोबत लग्न केलं होतं. मुंबईत करिअर करताना दोघांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण दोघांच्या लग्नाला सीमाच्या घरुन विरोध होता. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 


संबंधित बातम्या


20 December In History: राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी, आजच्याच दिवशी मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले