Sobhita Dhulipala Debut in Hollywood : कोणत्याही वशिल्याशिवाय बॉलीवूडमध्ये (Bollywood) काम मिळवणे आणि नंतर आपला ठसा उमटवणे हे आऊटसाइडर अर्थात 'बाहेर'च्या लोकांना सोपे नसते. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी गॉडफादर, सेलिब्रेटी नसतो. मात्र, कोणतीही पार्श्वभूमी नसताना अनेक कलाकारांनी आपले स्थान निर्माण केले आहे. जवळपास एक हजार वेळा ऑडिशन दिले पण स्कीन टोनमुळे तिला नकार देण्यात आला. मात्र, तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली.
शोभिताने दिल्या 1000 ऑडिशन्स...
शोभिता धुलिपालाने (Sobhita Dhulipala) जवळपास एक हजार ऑडिशन्स दिल्या. शोभिता धुलिपालाने 2010 च्या सुरुवातीला मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिचा मनोरंजन किंवा फॅशन जगताशी काहीही संबंध नव्हता. शोभिताने 2013 च्या 'मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेतला आणि तिने अंतिम फेरीतही स्थान मिळवले. एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' समिटमध्ये शोभिताने आपला स्ट्रगल सांगितला.
शोभिताने सांगितले की, “माझा चित्रपट जगताशी संबंध नव्हता. मला या जगतामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त ऑडिशन्सचा पर्याय होता. मी काही काळ मॉडेलिंग करत होतो. एक मॉडेल म्हणून मी जाहिरातींसाठी ऑडिशन दिली. मी माझ्या आयुष्यात 1000 ऑडिशन्स दिल्या असतील असे शोभिताने सांगितले.
स्किन टोनमुळे रिजेक्ट
एका थ्रोबॅक मुलाखतीत शोभिताने सांगितले होते की, स्किन टोनमुळे अनेकदा नकार आला. तिने पुढे सांगितले की, "जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करता, तेव्हा सर्व काही एका संघर्षासारखे असते. मला माझ्या जाहिरातीच्या ऑडिशन्स दरम्यान अनेकदा सांगितले गेले होते की मी 'गोरी'नाही. सुंदर दिसत नसल्याने नकार मिळत गेल्याचे तिने सांगितले.
शोभिता धुलिपाला करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण
2015 मध्ये, शोभिताने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे केली. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी शोभिताला नामांकनही मिळाले होते. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा शो 'मेड इन हेवन'मध्ये मुख्य भूमिका केली.
2022 आणि 2023 मध्ये, शोभिता ही मणिरत्नमच्या ऐतिहासिक महाकाव्य पोन्नियन सेल्वन (Ponniyin Selvan 1) आणि पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan 2) यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. दोन्ही चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून अधिक कमाई केली. या वर्षी शोभिता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. देव पटेल दिग्दर्शित 'मंकी मॅन' या भारतावर आधारित थ्रिलर चित्रपटात ती दिसणार आहे.