Shah Rukh Khan and Karan Johar :  शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि करण जोहर (Karan Johar) ही बॉलीवूडमधील सगळ्यात मोठी नावं. किंग खानच्या नावावर तर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड्सही आहे. तसेच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून करण जोहरचं नाव प्रसिद्ध आहे. करण जोहर हा अनेक कारणांमुळे बऱ्याचदा त्याच्या वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असतो. तसेच शाहरुख देखील अनेक कारणांमुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं आहे. पण नुकतच दाक्षिणात्य अभिनेत्री सुचित्रा हिच्या एका मोठ्या दाव्यामुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं आहे. 


दाक्षिणात्य अभिनेत्री सुचित्रा हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुख आणि करण जोहर हे समलैंगिक संबंध ठेवत असल्याचा दावा केला आहे. तिच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु झालीये. याचसोबत सुचित्राने तिचा एक्स नवरा कार्तिक हा देखील समलैंगिक असल्याचा दावा केलाय. यावर तिच्या नवऱ्यानेही स्पष्टीकरण दिलंय. पण शाहरुख आणि करण जौरहबाबत तिने केलेल्या दाव्याने एकच चर्चा सुरु झालीये. 


दाक्षिणात्य गायिकेचा मोठा दावा


सुचित्रा रामदुराई ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. ती कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतंच सुचित्राने कुमदूम या तामिळ चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने शाहरुख आणि करणविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी तिने बॉलीवूड सेलिब्रेटींमध्येही समलैंगिक संबंध असातात असंही म्हटलं आहे. तसेच तिचा नवरा कार्तिक हा गे असून त्याने शाहरुख आणि करणसोबत शारिरीक संबंध ठेवले होते, असा दावा तिने केला आहे. 


पुढे तिने म्हटलं की, जिथे समलैंगिक संबंधांना मान्यता आहे, अशा अनेक देशांमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार सतत प्रवास करत असतात. एकदा कार्तिक जेव्हा लंडनला गेला होता, तेव्हा तो शाहरुख आणि करणला भेटला. ते लंडनमधील एका बारच्या गल्लीत फिरत होते.ते सगळे क्रॉस्ड ड्रेस होते. करण आणि शाहरुख बऱ्याचदा परदेशात गेल्यावर असे वावरतात. ते असे कपडे घालून गे एरियात जातात आणि तिकडच्या परिसरात मिसळतात आणि रात्रीचा आनंद घेतात."






सुचित्राच्या  नवऱ्याने दिलं स्पष्टीकरण


दरम्यान सुचित्राच्या या मुलाखीतीची क्लिप सोशल मीडियावरही बरीच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. तिच्या या दाव्यावर तिच्या नवऱ्यानेही स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याने म्हटलं की, मला सगळ्या प्रकारच्या लैंगिक संबंधनाचा अभिमान आहे, त्यामध्ये शरमेची गोष्ट नाही. जर मी समलैंगिक असेन तर मी ते आनंदाने स्वीकारेन.






ही बातमी वाचा : 


Anand Ingale : 'कुठलेतरी दोन मित्र घ्यायचे अन् घाणेरडी कॉमेडी करुन गलिच्छ सिनेमा करायचा'; आनंद इंगळेंचं इंडस्ट्रीतल्या 'त्या' काळाविषयी व्यक्त केलं स्पष्ट मत