मुंबई : गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाचा 22 वर्षांचा संसार मोडला आहे. हिमेश आणि त्याची पत्नी कोमलने मंगळवारी वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
'तेरा सुरुर' गाण्यामुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेला हिमेश रेशमिया आता संसार मोडण्याच्या कारणामुळे चर्चेत आहेत. 'तेरा सुरुर'फेम गायक हिमेशचं अफेअर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
हिमेश मागील काही महिने पत्नी कोमलपासून वेगळं राहत आहे. काही वर्षांपूर्वी हिमेश आणि टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर यांच्यात संबंध असल्याची चर्चा होती.
परस्पर सामंजस्याने दोघे वेगळं होत आहेत. घटस्फोटाचा निर्णय कोणत्याही दबावाखाली घेतलेला नाही. वेगळे होऊनही एकमेकांच्या कुटुंबीयांसोबत दोघांचे संबंध चांगलेच असतील. शिवाय दोघांनी मिळून मुलगा शिवमचं पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही हिमेश आणि कोमलच्या वतीने सांगण्यात आलं आहे.