Daler Mehndi : पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) सध्या कारावासात आहे. पटियाला कोर्टानं मानव तस्करी प्रकरणी दलेर मेहंगदीला दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण 2003 मधील असून आता 15 वर्षानंतर या प्रकणावर सुनावणी करण्यात आली आहे.
दलेर मेहंदीचे मानव तस्करी प्रकरण हे 2003 सालातले असून आज पटियाला कोर्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. सुनावणीदरम्यान कोर्टाने दलेर मेहंदीला दोषी ठरवले. सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळजवळ 15 वर्षांनंतर या दलेर मेहंदीच्या मानव तस्करी प्रकरणीचा निर्णय झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पंजाबी गायक दलेर मेहंदी गाण्यांच्या कार्यक्रमासाठी अनेकदा विदेशात दौरा करत असे. असेच 1998-99 साली एका दौऱ्यादरम्यान ते 10 लोकांना परवानगी न घेता ते अमेरिकेत घेऊन गेले. त्या दहा लोकांकडून त्यांनी अमेरिकेत जाण्यासाठी पैसेदेखील घेतले. त्यामुळे दलेर मेहंदीवर मानव तस्करीची एफआयआर दाखल केली. चौकशीनंतर दलेर मेहंदीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता मानव तस्करी प्रकरणाचा निर्णय झाल्यानंतर पोलिसांनी दलेर मेहंदीला पुन्हा ताब्यात घेतले आहे.
दलेर मेहंदी कोण आहे?
1995 मध्ये दलेर मेहंदीचा ‘बोलो तारारारा’ हा पहिला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. 1998 मध्ये दलेर मेहंदीचा ‘तुनक तुनक तून’ हा अल्बमही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. बिहारच्या पाटण्यात 18 ऑगस्ट 1967 साली जन्मलेले दलेर मेहंदी गायक तर आहेतच शिवाय गीतकार, लेखक आणि निर्माता देखील आहे. दलेर मेहंदीने आपल्या बुलंद आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दलेर मेहंदी यांनी आपल्या दमदार आवाजानं प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं आहे.
संबंधित बातम्या