Good Luck Jerry Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) ‘गुड लक जेरी’ (Good Luck Jerry) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जेरी नावाच्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दाखवण्यात आल्या आहेत. या समस्यांचा सामना जेरी कशी करते? या प्रश्नाचे उत्तर ‘गुड लक जेरी’या चित्रपटातून मिळणार आहे. 


‘गुड लक जेरी’या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरसोबतच दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांनी केली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. सिद्धार्थ सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सस्पेन्स, कॉमेडी आणि अॅक्शन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. जान्हवीनं देखील ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करुन जान्हवीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जेरीला भेटा. ही दिसते तशी नाहीये.'


पाहा ट्रेलर:



29 जुलै 2022 रोजी डिज्नी प्लस हॉस्टारवर गुड लक जेरी चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची जान्हवीचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. जान्हवीचे लवकरच काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. जान्हवीचा 'बवाल' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये जान्हवीसोबत अभिनेता वरुण धवन देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 'बवाल' सिनेमाचे शूटिंग पोलंडमध्ये होत आहे. जान्हवीने वरुणसोबतचा एक खास फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या सिनेमासाठी वरुण आणि जान्हवी दोघेही उत्सुक आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून जान्हवी आणि वरुणची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


हेही वाचा: