Sidharth Malhotra, Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या ‘शेरशाह’ (Shershaah) या चित्रपटाला रिलीज होऊन आज (12 ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच निमित्ताने दोघांनीही चाहत्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री कियाराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटातील एक डायलॉग शेअर केला आहे. सिद्धार्थ मल्होत्राला टॅग करत कियाराने लिहिले की, ‘तू बातें तो बड़ी-बड़ी करता था..पर तू भी न आऊट ऑफ स्टेज, आऊट ऑफ माईंड टाईप का बंदा निकला’.


कियाराची ही पोस्ट पाहून चाहते बुचकळ्यात पडले होते. कियारा सिद्धार्थला नेमकं असं का म्हणाली, हे कुणाच्याच लक्षात येत नव्हतं. काही काळापूर्वी सिद्धार्थ आणि कियाराच्या डेटिंगच्या आणि ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. यातच आता तिने अशी पोस्ट लिहिल्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते. मात्र, सिद्धार्थने शेअर केलेल्या पोस्टमुळे या प्रश्नांची उत्तरं मिळाली.


पाहा सिद्धार्थची पोस्ट :



सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण झाले असून, कियाराने लिहिलेले सर्व डायलॉग हे ‘शेरशाह’ या चित्रपटाचे आहेत. कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्याने एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘शेरशाहने 1 वर्ष पूर्ण केले आहे. जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेलेली कथा.. लोकांच्या मनासोबतच या चित्रपटाने अनेक पुरस्कारही जिंकले. या चित्रपटाने आयुष्यभराची छाप सोडली आहे. एक वर्ष पूर्ण! ‘ये दिल मांगे’ मोर’


सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये सुरु होती. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल गंभीर आहेत. मधल्या काळात त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या, पण करण जोहरने दोघांचे पॅचअप केले. याचा खुलासा खुद्द करणने त्याच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये केला होता.


चित्रपटाच्या कथानकाने जिंकलं मन!


‘शेरशाह’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने ‘कॅप्टन विक्रम बत्रा’ यांची भूमिका साकारली होती. भारतीय सैन्याचे कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999मध्ये कारगिल युद्धा दरम्यान भारतीय क्षेत्राचं संरक्षण केलं होतं. या युद्धात ते शहीद झाले होते. त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘परमवीरचक्र’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999मध्ये कारगिल युद्धादरम्यान दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना 'शेरशाह' असं म्हटलं जातं. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री कियारा अडवानी मुख्य भूमिकेत दिसली होती.


हेही वाचा :


Sidharth Malhotra पासून Kiara Advani पर्यंत, Shershaah स्टारकास्टचे मानधन ऐकून व्हाल थक्क!


Indian Army Day : 'बॉर्डर'पासून 'शेरशाह' ते 'उरी'पर्यंत... 'हे' चित्रपट दाखवतात भारतीय जवानांचे धैर्य