Bollywood Movies : भारतीय लष्करावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत, ज्यामध्ये सैनिकांचे बलिदान आणि शौर्य दाखवण्यात आले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच खूप पसंती दिली आहे आणि भरभरून प्रेमही दिले आहे. हे चित्रपटांमध्ये सैनिकांचे शौर्य पाहून आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ लोकांच्या मनात निर्माण होते. या चित्रपटांपासून प्रेरित होऊन अनेक जण भारतीय लष्करात भरती होण्याचा निर्णयही घेतात. आज भारतीय लष्कर दिनानिमित्त आम्ही तुम्हाला भारतीय लष्करावर बनवलेल्या देशभक्तीपर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.


शेरशाह - परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर शेरशाह हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांचे धैर्य दाखवण्यात आले आहे. अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते, त्यात विक्रम बत्रा हे देखील होते. शेरशाहमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा​आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे.


उरी: सर्जिकल स्ट्राईक - 2016 मध्ये पाकिस्तानच्या उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. या सर्जिकल स्ट्राईकवर 2019 साली चित्रपट बनवण्यात आला होता. ज्यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.


लक्ष्य - हृतिक रोशनचा 'लक्ष्य' हा चित्रपट आजही प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागवतो. या चित्रपटात प्रिती झिंटा हृतिकसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या युद्धपटाची कथा लेफ्टनंट करण शेरगिलवर आधारित आहे.


बॉर्डर - जेपी दत्ता यांचा हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात सैनिकांची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट आजही पहिल्या दिवसाप्रमाणेच लोकप्रिय आहे. बॉर्डरमध्ये सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले होते.


एलओसी कारगिल - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्धावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही जेपी दत्ता यांनी केले होते. या चित्रपटात संजय दत्त, अजय देवगण आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha